पन्हाळा शासकिय विश्राम गृह जवळ कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण पत्रकारांची अडिअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवसाचे बैठक आयोजित करण्यात आले होते. नवीन नवोदित व तज्ञ वरिष्ठ पत्रकार सभासद पदाधिकारीसह भागातील पत्रकार उपस्थित कार्यक्रम झाला.
सुरवातीला संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा पत्रकार संघाच्या कार्याला सोळा वर्षांपर्यंतच्या कार्याची आढावा दिला. आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अखंडपणे सेवा सुरू असल्याचे सांगितले. पत्रकारांनी आपल्या सह आपल्या कुटुंबाला पत्रकारांसाठी शासन स्तरावर असलेल्या योजनांची लाभ घ्यावा तसेच पत्रकारिता करत असताना आपला विश्वासहर्ता व चांगले कार्य करून आपले रेकॉर्ड करून दप्तरी नोंद ठेवावे यामुळे शासन स्तरावर असलेल्या योजनांचे लाभ मिळतिल त्यासाठी लागणारी मदत युवा पत्रकार संघ करण्यास तयार आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती मध्ये संचार टाइम्सचे बीरोचिफ मंजूभाय सरकवास,व वरिष्ठ पत्रकार नंदकुमार तेली होते.
ग्रामीण पत्रकार संदर्भात मार्गदर्शनपर बोलताना माध्यम तज्ञ विवेक पोर्लेकर यांनी पत्रकारांनी आपले खरी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या लेखणीतून बातमी करत असताना प्रथम बातमीची परिस्थिती समजावून घेऊन तळापर्यंत जाऊन आपल्याकडे योग्य ते पुरावा ठेवूनच बातमी केलेली कधीही चांगले आहे, आपल्या स्वतःचा अनुभव सांगत असताना अनेक उदाहरणे त्यांनी उपस्थित पत्रकारांना लाभ होईल असे आपल्या उद्गारातून त्यांनी मांडले. तसेच युवा पत्रकार संघाने घेतलेली आजची बैठक खरोखर कौतुकास्पद असून अनेक ग्रामीण भागामध्ये पत्रकांची समस्या खूप आहे त्यासाठी मेळावा / परिषद च्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यास उपयुक्त ठरेल भविष्यात युवा पत्रकार संघाने ग्रामीण भागामध्ये लक्ष घालून ग्रामीण पत्रकारांची समस्या सोडवावेत असेही सूचना त्यांनी दिले.
संचार टाइम्स चे मंजुभाय सरकवास यांनी आपल्या मनोगतात आपली व अध्यक्ष शिवाजी शिंगे यांची १९ वर्षापासून संबंध असल्याचे सांगत पूर्वी संघर्षमय पत्रकारिता करताना अनेक आम्हाला अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले आता पत्रकारिर्तेत अनेक बदल घडत गेली आहेत पत्रकारांनी एकजुटी व एकत्र राहिल्यास अनेक अडचणीवर मात करून अनेक प्रश्न आपण सोडवू शकतो त्यासाठी एकत्र राहण्याचे व एकत्र येण्याचे त्यांनी सल्ला दिला. भविष्यामध्ये गरज लागल्यास माझ्या वुमन राईट संघटनेच्या माध्यमातून युवा पत्रकार संघाला मदत करण्याचेही त्यांनी ग्वाही दिली.
पोलीस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉ. युवराज मोरे यांनी आपल्या मनोगतात कडवट पण वस्तुस्थिती सत्य परिस्थिती आजची पत्रकारिता कशी चालते याबद्दल उपस्थितांना खोचकपणे बोलत प्रामाणिकपणे पत्रकारिता केल्यास वाईट वृतींना आपल्याकडे बोट करणयाचे धाडस कोणाकडून होणार नाही असे ते म्हणाले. पत्रकारांनी निव्वळ पैशाच्या मागे न पळता सामाजिक वृत्तीने पत्रकारिता करावी आपल्या दैनंदिन कार्यात आपल्यामध्ये बदल घडले पाहिजे असेही त्यांनी प्रकखडपणे मत मांडले. वरिष्ठ पत्रकार नंदकुमार तेली यांनी आजची बैठक ग्रामीण पत्रकारांची समस्या व अडिअडचणी जाणून घेण्यासाठी असून अनेक वेळा आपल्या संघाचे मूळ उद्देश बाजूला राहत असल्याचे जाणीव करून दिली तसेच संघाने मूळ उद्देश पकडून आपले कार्य केले पाहिजे पदाधिकार्यांनी सभासदांच्या कडे बारकाईने लक्ष देऊन जेष्ठ पत्रकारांचे सल्ला घेऊन संघाचे उद्देश साध्य होईल अश्या प्रकारे काम केल्यास यश नक्कीच मिळेल असे विश्वास त्यांनी व्यक्त केला पुढे बोलताना ते म्हणाले कोणाबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा आपल्य पत्रकारितेची मूल्य जपले पाहिजे रोज थोडे थोडे आपल्यात सुधारणा झाली पाहिजे, शेवटी त्यांनी, पुढारीचे वरिष्ठ पत्रकार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत युवा पत्रकार संघाचे १६ वा वर्धापन दिन साजरा केल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.
युवा नेते अमर देसाई,प्रकाश कांबळे,व कौतुक नागवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सुरवातच युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन पन्हाळा तालुका अध्यक्ष साहिल पवार, कार्याध्यक्ष शाहबाज मुजावर यांचीसह कार्यकारिणीची जाहीर करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्य खजानीस-नियाज जमादार, प्रदेश उपाध्यक्ष मेघराज हट्टी, अमोल पोतदार, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष आमोल कुरणे,अजय शिंगे, रविराज कांबळे, संतोष कुरणे, जावेद देवदी, शिवाजी धनवंत, लखन आणि ग्रामीण परिसरातील पत्रकार नागरिक उपस्थित होते. शेवटी सचिव शरद माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.