Share Now
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : शहरातील विविध सामाजिक संस्थांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज हापूस आंब्याची भेट दिली.
अनाथाश्रम, सावली बेघर निवारा केंद्र आदी ठिकाणी त्यांनी हापूस आंबे भेट दिले. दरवर्षी उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे हापूस आंब्याची चव घेण्याचा मौसम असतो,मात्र यंदा कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे हापूस आंबे खायला मिळणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन आमदार गाडगीळ यांनी स्वतः प्रयत्न करून अनाथाश्रम, महिला वृध्दाश्रम, मुलांचे निरीक्षण गृह या संस्थासाठी हापूस आंबे भेट देण्याचा निर्णय घेतला व अखिल भारतीय महिला संस्था भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, वेलणकर अनाथालय, कै. दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षणगृह (बालगृह)चे मुकुंद कुलकर्णी, सावली बेघर निवारा केंद्रचे मुस्तफा मुजावर यांच्याकडे आमदार गाडगीळ यांनी हापूस आंबे भेट दिले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुधीर गाडगीळ यांच्या
या उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Share Now