Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:2 Minute, 52 Second
शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रागंणात जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमी वर सामान्य माणसाच्या दगदगीच्या जीवनामध्ये आशेचा किरण दाखविणार्या दिग्गज कलाकार ज्येष्ठ नाटककार चंद्रकांत जोशी, नाट्य दिग्दर्शक प्रा.प्रकाश इनामदार, अभिनेत्री श्रध्दा पोवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष एस.एस्. टाकळीकर, नाट्य कलाकार किरणसिंह चव्हाण, नाट्य दिग्दर्शक प्रा. सुधीर पाटील यांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत आणि उपाध्यक्ष राहुल चौधरी यांचे हस्ते शाल श्रीफळ ,स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ देउन करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा प्रकाश इनामदार सर यांनी अशाश्वत लोकांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आला याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन संस्थेच्या माध्यमातून नाट्यकर्मीच्यां सत्काराविषयी समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत जोशी सरांनी नाट्य परंपरा विषद करून नाटकाला गर्दी पेक्षा दर्दी महत्वाचा असल्याचे नमूद केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत, उपाध्यक्ष राहुल चौधरी,रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हा ध्यक्ष रवींद्र मोरे, चित्रपट निर्मिते संदीप जाधव,सामाजिक कार्यकर्त्या सारीका शिंदे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे संजय पाटील, प्रतिष्ठानचे संचालक संतोष परब,निखिल जाधव,सामाजिक कार्यकर्ते करण शिंदे, माजी नगरसेवक कमलाकर भोपळे, राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप,हर्षवर्धन पाटील, रतन बाणदार,माजी वनाधिकारी जगंनाथ चौगुले, गव्ह.कौन्सिलर रवीराज पाटील,भास्कर कांबळे,सचिन जाधव यांच्या सह सदस्य उपस्थित होते.
को ल्हापूर महानगरपालिका निवडणूक 20२१
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 20२१ प्रभाग क्रमांक ८ अनुसूचित जाती (सर्वसाधारण) मतदार संघ मधून निवडणूक इच्छुक आहे संजय आनंदराव चौगले आपल्या मीडियाशी जॉईंट होत आहे