कोजिमाशित सत्ताधाऱ्यांकडून सभासदांच्या जिव्हाळयाच्या मागण्यांना हरताळ – करोना काळात आर्थिक उधळपट्टी

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 37 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी :
कोजिमाशि पतसंस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दिनांक २८ मार्च रोजी दुपारी
दीड वाजता ऑनलाईन पध्दतीने पार पडत आहे. गेली सहा महिने विरोधी संचालकांनी
केलेली मागणी सत्ताधा-यांची इच्छा नसताना पार पाडण्याची नामुष्की सत्ताधारी
आघाडीवर आली आहे. संस्थेचे आर्थिक वर्षातील व्यवहार वेळेत पूर्ण व्हावेत, सभासदांना
लाभांश वेळेत मिळावा, संस्थेचा होणारा खर्च वाचावा, कोविड संक्रमण टाळले जावे
यासाठी विरोधी संचालकांनी गेल्या ऑगस्ट महिन्यापासून सभा व्ही सी व्दारे घ्यावी ही
मागणी केली होती परंतु ऑनलाइन सभेमुळे आपले महत्व कमी होईल या भितीपोटी व
आर्थिक खर्च करण्यावर मर्यादा येणार यामुळे सत्ताधारी ऑनलाइन सभा घेण्यास तयार
नव्हते परंतु सहकार खात्याचे आदेश आल्याने सभा ऑनलाइन घेण्याशिवाय पर्याय
राहिला नसलेने नाखूश होवून सभेचे आयोजन करणेत आले आहे.या ऑनलाईन सभेमुळे सभासदांना आपल्या मागण्या प्रत्यक्ष मांडण्यात येणार नाहीत आणि आम्ही लेखी स्वरूपात या मागण्या सभेत चर्चा करण्यासाठी ठेवल्या आहेत जर यावर विचार केला गेला नाही तर मात्र आम्ही सभासद राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन अथवा,निदर्शने करणार असल्याचे माजी संचालक समीर घोरपडे यांनी इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
सभासद कर्जाचा दर १० टक्के करणे. अनेक तालुका शिक्षक पतसंस्थांचा व्याजदर हा
९ टक्के इतका कमी केला आहे, सभासदांची कर्जमुक्ती योजनेतील संस्थेकडे असणारी बीनव्याजी रक्कम
सभासदांना परत देणे. संस्था हिस्सा व सभासद हिस्सा समान झालेने सत्ताधारी
आघाडीने वचननाम्यात सांगितल्या प्रमाणे सदरची रक्कम २०१७ पर्यंत परत देणे
अपेक्षित होते, सभासद शेअर्स भांडवल मर्यादा वाढवून किमान ५०,०००/- करणे. वाढविलेल्या शेअर्स
रकमेसाठी चिरंतन ठेवीमधील रक्कम एकरकमी घेवून शेअर्स मर्यादा पूर्ण करणे,
व्यवस्थापन खर्च कमी करणे यासह अन्य बऱ्याच मागण्याचा समावेश आहे यावर सत्ताधार्यांनी सभेत चर्चा करावी अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा दिला आहे यावेळी पत्रकार परिषदेला माजी सभापती बी.के.मोरे,संजय पाटील,बाळासाहेब ची दंगे, सिकंदर जमाल,सुरेश खोत,संजय जाधव,दत्तात्रय जाधव, संजय पाथरे,अनिल इंगळे, डी. पी.सुतार,जयसिंग पोवार, वसंत पाटील,आर. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *