Media control news network
कोल्हापूर, दि. १२ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन सोमवार, दि.१२ मे रोजी दुपारी १२ वाजता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत.या सोहळ्याला शहरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि जिल्ह्यातील इतर मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख (देसाई) यांनी दिली आहे.
————————-जाहिरात———————-