Share Now
Read Time:1 Minute, 33 Second
डिगे फाऊंडेशन तर्फे भीम फेस्टिव्हल ११ एप्रिल पासून ‘समाजभूषण’ सदानंद डिगे डॉ. आंबेडकर जयंती निमित्य विविध उपक्रम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती व क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांची १९४ वी जयंती निमित्य कालकथित माजी खासदार एस.के .डिगे मेमोरियल फाऊंडेशन तर्फे ११ ते १४ एप्रिल दरम्यान भीम फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.या कालावधीत भव्य प्रतिकृती, पुरस्कार, व्याख्यान, निबंधस्पर्धा, भोजनदान, वंचितांचा भेटवस्तू देवून, सत्कार, संविधान माहिती,बोधनात्मक भव्य आतषबाजी असे कार्यक्रम शासनाचे नियम व अटी पाळून होतील अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ‘समाजभूषण’ सदानंद डिगे यांनी पत्रकार याना दिली.यावेळी महादेव कांबळे, धोंडीराम कांबळे, अशोक भारकर, प्रभाकर कांबळे,योगेश डिगे, स्वप्नील डिगे, प्रा. डॉ. अतुल कांबळे, विकी माजगांवकर, कैलास शिंगे, विकी कांबळे (मिरजकर) राजू नाईक, हेमंत कांबळे, योगेश माजगांवकर आदि उपस्थित होते.
Share Now