Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
क्राईम रिपोर्टर : मार्था भोसले
कोल्हापूर: लक्षतिर्थ वसाहत येथील टायपिंग क्लास करून घरी परतणाऱ्या विवहतेचा पाठलाग करून जवळीक साधत विनयभंग केल्याप्रकरणी एकास लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. वैभव तानाजी भापकर (रा. तिसरा बसस्टॉप, फुलेवाडी),असे संशयित आरोपीचे नाव आहे.
१४/१०/२१ ते १७/१०/२१ दरम्यान लक्षतीर्थ वसाहत ते फुलेवाडी मेन रोड वर अक्टिव्हावरून संशयित वैभव भापकर त्या विवाहतेचा पाठलाग करीत राहिला. तिच्याकडे मोबाईल नंबर मागत होता. नंबर न दिल्याने घरी येण्याची धमकी देऊन विवाहतेच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. धमकाऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद विवाहतीने रितसर लक्षपुरी पोलिस ठाण्यात दिली.
Share Now