हमिदवाडा प्रतिनिधी, दि १ : कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे याबाबत ठोस उपाय योजना करून हा रासायनिक खतांचा तुटवडा पूर्ववत करावा या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी कार्यालय कागल या ठिकाणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आले…
कोल्हापूर जिल्हा प्रमुख व ऊस उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच भाजीपाला व इतर अंतर पिकेही घेतली जातात यामध्ये प्रामुख्याने ऊस पिकासाठी रासायनिक खतांची मागणी शेतकरी वर्गाकडून वाढलेली आहे सध्या ऊस पिकाचा भरणी चा काळ असल्याने शेतकरी किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे रासायनिक खतांची मागणी करत आहेत यामध्ये कागल तालुक्यात सह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुकानदारांकडे कृत्रिम तुटवडा जाणवत आहे, कंपन्यांकडून खतांचा पुरवठा होत नसल्याची तक्रार दुकानदार करीत आहेत त्यामुळे दुकानदारांबरोबरच शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात खत कंपन्यांनी साठेबाजी केल्याची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी
तक्रार केली आहे. यामुळे सदरच्या तक्रारींची योग्य ती चौकशी होऊन खतांचा तुटवडा सुरळीत करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन केले जाईल…
अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालय कागल या ठिकाणी दिलेले आहे…
यावेळी नेताजी बुवा जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सुनील जाधव मा.अध्यक्ष कागल तालुका, नितीन काळबर, महादेव कोईगडे,अरुण जकाते,संताजी घोरपडे,अतुल खद्रे, नाना बरकाळे इ. कार्यकर्ते उपस्थित होते