कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ :
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब कोल्हापूर, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन ,कोल्हापूर महानगरपालीका आणि लक्षतीर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंबुखडी येथे वनराई साकारण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने ७५ देशी वृक्ष लागवड करण्यात आली.
सध्या वाढत्या शहरीकरणामुळे कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरातील वनराई बांधकामाची कारणे पुढे करून नष्ट करण्यात आलेली आहेत. याचे दुष्परिणाम तापमान वाढीतून सध्या दिसून येत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल देखील ढासळत चालला आहे. वन्यजीव इतर पशुपक्षी यांचे अन्नसाखळी अबाधित राहावी यांच्यासाठी वनराई निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच चंबुखडी येथील महापालिकेच्या ओपन जागेमध्ये आज ७५ देशी वृक्ष लागवड करून एक लहान वनराई साकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आजच्या या वृक्षलागवड मोहिमेमध्ये को. म.पालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे मॅडम, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, रोटरी क्लब चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरिष धोंड सर, रो.भारती नायक, रो.मीरा कुलकर्णी, रो.उदय पाटील, रो.स्वप्नील कामत, रो. रवीकुमार केलगीमठ, रो.सुमीत बिरंजे, रो. मेघराज चुघ, रो. कुशल राठोड, रो. अभिजीत वज्रमुष्ठी, रो.अमित पुनमिया, रो. प्रिया बासराणी, रो. सविता पाटील, श्री. अमोल बुधे आणि वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, रोटरी क्लब ऑफ रॉयल्स, रोटरी क्लब ऑफ करवीर, रोटरी क्लब ऑफ मिड टाऊन , रोटरी क्लब ऑफ हेरिटेज, रोटरी क्लब ऑफ होरायझन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि लक्षतीर्थ वृक्ष संवर्धन फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला .