Share Now
Media Control Online :
राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली होती. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील १६ जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी कर्नाटक आणि राजस्थानमधील ८ जागांचे निकाल मतदान संपल्यानंतर जाहीर करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगानं सुहास कांदे यांचं मत बाद केल्यानंतर मतमोजणी सुरु झाली. महाराष्ट्रातील सहा जागांवर भाजपकडून पियूष गोयल,डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल आणि इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली होती. पियूष गोयल, अनिल बोंडे, संजय राऊत, प्रफुल पटेल आणि इमरान प्रतापगढी यांचा विजय झाला आहे.
संजय पवार यांना पहिल्या फेरीत ३३ मतं मिळाली आहेत. तर धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत २६ मतं मिळाली आहेत.
Share Now