अट्टल मोटरसायकल चोरटे जेरबंद…!

0 0

Share Now

Read Time:6 Minute, 9 Second

विशेष वृत्त शिवाजी शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी : जुना राजवाडा पोलीस ठाणे व कोल्हापूर शहर हद्दीतून मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असलेने त्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत वारंवार सुचित केले होते. त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने यापुर्वी घडलेल्या गुन्ह्यांच्या तारीख, वेळ व ठिकाणांची आभ्यासपुर्वक माहिती घेवून जास्त प्रमाणात ज्या ठिकाणाहून मोटर सायकली चोरी होतात ती ठिकाणे निवडून त्यापैकी आंबाई टँक परिसरामध्ये दिनांक १६/०६/२०२२ रोजी सायंकाळच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत इंगळे व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार वेशांतर करून सापळा लावून थांबले असता फुलेवाडी रोडकडून विना नंबर प्लेटच्या काळे रंगाच्या स्प्लेंडर मोटर सायकलीवरून दोन इसम अंबाई टँक येथील रिक्षा स्टॉप जवळ येवून थांबले. त्यावेळी ते दोघे रोडच्या कडेला पार्किंग केलेल्या मोटर सायकली न्याहाळू लागले. त्यानंतर मागे बसलेला इसम खाली उतरून पार्किंग केलेल्या मोटर सायकलींचे हँडल चेक करू लागला असता, त्यांचा पोलीस पथकास संशय आलेने पोलीस उप निरीक्षक इंगळे यांचे इशा-यावरून पोलीस पथक त्यांचे दिशेन धावत गेले असता त्यांना चाहुल लागताच ते दोन्ही इसम मोटर सायकलवर बसून क्रेशर चौकाच्या दिशेने वेगात निघाले त्यावेळी पोलीस पथकांने त्यांचेकडील मोटर सायकलींवरून थरारक पाठलाग करून त्यांना पतौडी खणीच्या समोर घेराव घालुन पकडले व त्यांचेकडे चौकशी केली असता, ते उडवा-उडवीची उत्तरे देवु लागले. त्यावेळी त्यांचे ताब्यात असले विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलची चौकशी करुन कागदपत्रे मागीतली असता त्यांनी काही एक समाधानकारक माहिती दिली नाही. म्हणुन त्यांचा पथकास संशय आलेने त्यांना पोलीस ठाणेस आणून नाव, पत्ता विचारला असता त्यांनी आपली नावे अनुक्रमे १] अलंकार बाबुराव पाटील, वय २१ वर्षे रा. मु.पो. सावे, ता.शाहुवाडी, जि.कोल्हापुर. २] अमर निवास खामकर, वय २५ वर्षे, रा. साखरे गल्ली, शिवाजी स्टेडीयम जवळ,मलकापूर, ता.शाहुवाडी, जि. कोल्हापुर अशी सांगीतली

त्यावेळी त्यांचे कब्जात मिळून आले मोटरसायकलचे चेसिस नंबर व इंजीन नंबर वरून माहिती काढली असता तीचा आरटीओ पासिंग नं. MH-०९- BR-३०६० असा असल्याचे समजले व सदरची गाडी जुना राजवाडा पोलीस ठाणे गु.र.नं. २९४/२०२२ भा.द.वि.स.कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल असल्याचे निष्पन्न झाले.त्यावेळी सदर संशयीत इसमांना विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून गेले १५ दिवसापुर्वी सानेगुरूजी वसाहतीतील देशमुख हायस्कुल पाठीमागुन सदरची मोटरसायकल चोरली असल्याची कबुली दिल्याने त्यांना नमुद गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलीस कोठडी घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी अशाप्रकारे कोल्हापूर शहर व परिसरातून आणखीण मोटर सायकली चोरी केल्या असल्याची कबुली देवून सदरच्या मोटर सायकली ज्या ठिकाणी लपवून ठेवल्या ती ठिकाणे दाखवून काढून दिल्या असून त्यांचेकडून ५,८५,०००/- रूपये किंमतीच्या एकूण २४ चोरीच्या मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यातुन शहर व परिसरातील एकूण २४ गुन्हे उघडकीस आले आहेत

 संबंधित गुन्हे शोध पथकास  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून  २० हजार रुपये  बक्षिस म्हणून देण्यात आले

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अभिजीत इंगळे, पोलीस उप निरीक्षक संदिप जाधव, परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, संदिप माने, सतिश बांबरे, प्रितम मिठारी, अमर पाटील, संदिप पाटील,योगेश गोसावी, संदिप बेंद्रे, गौरव शिंदे, नितीश कुराडे, तुषार भोसले, उत्तम गुरव, यांनी केलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *