कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, नाले सफाई, आरोग्य सुविधा, लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर याबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीमध्ये संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महापालिकेने केलेले नियोजनाबाबत सविस्तर माहिती घेतली. सन २०१९ आणि २०२१ मध्ये कोल्हापूर शहरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी आल्याने नुकसान झाले होते. यानंतर प्रशासनाच्या झालेल्या बैठकांमध्ये अनेक सूचना करण्यात आल्या होत्या यासंदर्भामधे सुद्धा यावेळी आढावा घेतला तसेच बैठकीतील सर्व सूचनांचे पालन करण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
सध्याच्या संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सविस्तर एसओपी तयार करावी. पावसाळ्यामध्ये साथीचे रोग पसरू नये यासाठी वेळेवर औषध फवारणी करावे, पूर काळात पाणीपुरवठा न झाल्यास टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो त्यामुळे एकाच वेळी किमान १० टॅंकर भरले जावेत अशी ठिकाण निवडण्याबाबतही सूचना करण्यात आली आहे. याचसोबत बैठकीमध्ये ज्या सूचना करण्यात आले आहेत, त्याची तातडीने सोडवणूक करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
संभाव्य पूरस्थिती आणि आपत्ती काळातील नियोजन या संदर्भात आज आ. जयश्रीताई जाधव, महानगरपालिका आयुक्त, विविध विभागाचे अधिकारी आणि पूर येणाऱ्या भागातील माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेत सविस्तर आढावा घेतला.