Share Now
कोल्हापूर/प्रतिनिधी : विठुरायाच्या दर्शनच्या ओढीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी प्रवाश्यांना राज्य परिवहन कोल्हापूर विभागातर्फे आज वेफर्स, बटाटे चिवडा, केळी असा उपवास अल्पोपहार आणि शुद्ध पेयजल वाटप करण्यात आले.कोल्हापूर विभागामार्फत २०१८ पासून या उपक्रम राबविण्यात येत आहे, मात्र गेली ०२ वर्षे पंढरपूर वारी न झाल्यामुळे खंड पडलेल्या या उपक्रमास यावर्षी पुन्हा चालना मिळाली.जवळपास एक हजार वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला. एस टी महामंडळाच्या या उपक्रमाचे सर्व वारकरी तसेच प्रवासी बांधवांनी भरभरून कौतुक केले.विभाग नियंत्रक, रा. प. कोल्हापूर विभाग, आगार व्यवस्थापक, रा. प. कोल्हापूर आगार व सर्व शाखा प्रमुख यांच्या उपस्थितीत आजचा हा उपक्रम संपन्न झाला.उपक्रम यशस्वी होण्यासाठी कोल्हापूर विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
Share Now