जेएसटीएआरसी कोल्हापूरचा संघ दोन जागतिक स्पर्धेसाठी रवाना…

कोल्हापूर : जेएसटीएआरसी ही कोल्हापुरातील स्वसंरक्षणासाठी तायक्वॅान्डोचे प्रशिक्षण देणाऱ्या या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून  जेएसटीएआरसी “कोरियाफेस्ट” अंतर्गत दक्षिण कोरीया येथील आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होते व विद्यार्थ्यांना तायक्वॅान्डो मधील विविध स्पर्धांचे प्रशिक्षण […]

‘विषय हार्ड’ सिनेमाचा कोल्हापूरात मोठ्या जल्लोषात प्रिमियर लॉन्च….

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा ‘विषय हार्ड ‘हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून कोल्हापूरातील पीव्हीआर सिनेप्लेक्स येथे सुमित,पर्ण पेठे यांच्यासह सर्व कलाकारांच्या उपस्थितीत प्रिमियर शो उत्साहात व दणक्यात संपन्न […]

टाकळीवाडीच्या तरुणाला कुरुंदवाड पोलिसांनी 34 हजार रुपयाच्या गांजा सह घेतले ताब्यात..

Kolhapur News : टाकळीवाडी येथील ऋषिकेश रामचंद्र वडर वय 21 वर्षे हा मिरज येथून गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड एसटी बस मधून कुरुंदवाड बस स्थानक येथे आला असता कुरुंदवाड पोलिसांनी 34 हजार रुपयाच्या गांजा सह […]

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना 15 हजार रुपये दंड…
तीन व्यापा-यांकडून 500 किलो प्लास्टिक जप्त

कोल्हापूर: महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांच्या पथकांमार्फत तपासणी मोहिम व कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागच्यावतीने लक्ष्मीपुरी परिसरात एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली. […]

महापालिकेच्यावतीने आरोग्य सर्व्हेक्षण ५९८४ कंटेनरची तपासणी

कोल्हापूर :  महापालिकच्या आरोग्य विभागामार्फत डेग्यू, चिकनगुनिया व मलेरीया करीता दैनंदिन कंटेनर सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. शुक्रवारी ५९८४ कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये १९६६ कंटेनर मध्ये डेंग्यु डासाच्या अळया आढळून आल्या. हे सर्व्हेक्षण सरदार तालीम, फिरंगाई मंदीर, शिवाजीपेट, रजारामपुरी, यादवनगर, […]

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये देशात चौथा क्रमांक प्राप्त उंड्री येथील अमोल यादव यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर, दि. 5 : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जगातील सर्वात जुन्या, मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उंड्री (ता. पन्हाळा) येथील अमोल एकनाथ यादव यांनी देशातून चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून भारताचे प्रतिनिधित्व […]

ते निनावी पत्र खोडसाळपणातून व व्यक्तिगत द्वेषातून –
योगेश गोडबोले

  गोकुळच्या पशुसंवर्धन विभागामधील अधिकारी यांच्या कथित औषध खरेदीबाबतची माहिती एका निनावी पत्राच्या आधारे काही प्रसिद्धी माध्यमातून मिळाली आहे त्या बाबतचा खुलासा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न दूध उत्पादकांना अनेक […]

कोल्हापूर शहरात खुलेआम सुरु असलेल्या वैश्या व्यवसायावर आणि पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई :
शिवसेना महिला आघाडीची पोलीस प्रशासनाकडे मागणी

कोल्हापूर दि.०५ : गेल्या काही दिवसांपूर्वी शिंगणापूर परिसरात दोन बांगलादेशी महिलांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. सदर महिला विना पासपोर्ट, व्हिसा कोल्हापुरात अनेक महिन्यांपासून वास्तव्यास असल्याची निदर्शनास आले आहे. त्याच अनुषंगाने व्हीनस कॉर्नर येथे […]

जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 5: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.12 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- […]

रांगड्या मातीतला.. “रांगडा” सिनेमा १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला..!!

कोल्हापूर /प्रतिनिधी: शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी “रांगडा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब […]