
कोल्हापूर- गेल्या काही काळापासून ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके अभिनीत ‘ऑपरेशन लंडन कॅफे’ हा चित्रपट आहे. हा सिनेमा संपूर्ण भारतात मराठी, कन्नड, आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं पोस्टर पाहून हा सिनेमा एक्शन पॅक्ड असल्याचं दिसतय. आणि हेच पोस्टर चित्रपटाची उंची, भव्यता दर्शवत आहे.
हा चित्रपट कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. एक्शन पॅक्ड अशा या चित्रपटाला रोमँटिक झालर आहे ती कशी ते मात्र तुम्हाला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा एक अनोखा पैलू म्हणजे कन्नड कलाकारांनी या चित्रपटासाठी मराठी भाषा शिकली आणि मराठी कलाकारांनी चित्रपटातील भूमिकांसाठी कन्नड भाषा शिकली. चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरने अर्थात सिनेमाप्रती उत्सुकता वाढविली आहे. पोस्टरवरील कलाकार तर पॉवर पॅक्ड अभिनय देण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे. कवीश शेट्टी आणि मेघा शेट्टी यांनी त्यांच्या अभिनयाने साऊथ सिनेसृष्टी गाजवली आहे तर शिवानी सुर्वेच्या अभिनयाचा आणि ग्लॅमरसचा केवळ महाराष्ट्रातच नाहीतर महाराष्ट्राबाहेरही मोठा चाहतावर्ग आहे. तर विराट मडकेच्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाची भर पडणार आहे. अश्विनी चवरे हिच्याही अभिनयाची जादू या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्मस’ बॅनर आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण आर.डी. नागार्जुन यांनी केले आहे. येत्या २८ नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात 
