Kolhapur News : टाकळीवाडी येथील ऋषिकेश रामचंद्र वडर वय 21 वर्षे हा मिरज येथून गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड एसटी बस मधून कुरुंदवाड बस स्थानक येथे आला असता कुरुंदवाड पोलिसांनी 34 हजार रुपयाच्या गांजा सह ताब्यात घेतले आहे.
टाकळीवाडी येथील तरुण ऋषिकेश रामचंद्र वडर याची टाकळीवाडी येथे पानपट्टी असून या ठिकाणी विक्री करण्यासाठी मिरज येथून 34 हजार रुपये किमतीचा 1 हजार 700 ग्रॅम गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड सिटी बस ने कुरुंदवाड येथे बसने संशयित आरोपी वडर हा येणार असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार सपोनि रविराज फडणीस यांच्या पथकाने बस स्थानक जवळ असणाऱ्या शिकलगार वसाहत ते शिवतीर्थ कडे जाणाऱ्या रस्त्यावर वडर याला गांजा सह रंगेहात पकडले. या पथकात पोसई सागर पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप,
पोलीस नाईक संतोष साबळे, पोलीस पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजारी, गोपनीय फारुख जमादार, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासो कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे हे होते अधिक तपास पोसई सागर पवार हे करीत आहेत