
कोल्हापूर /प्रतिनिधी, दलित समाजातील निराधार गोरगरीब असाहय महिलांच्या न्याय मागण्या गेली ३२ वर्षे महाराष्ट्र शासनाने प्रलंबित ठेवल्या आहेत. गेली ३०/३२ वर्षे आम्ही राज्य शासनाकडे शेकडो मोर्चे काढून न्याय अंदोलन करीत आहोत. दलित समाजातील देवदासीचा घरकुल प्रस्ताव प्रलंबित आहे तो प्रस्ताव त्वरीत मंजूर करावा. राज्य शासनाने सन १९९२ साली विनाअट स्विकारलेल्या देवदासी अभ्यास गटाच्या गुंडाळून ठेवलेल्या शिफारशीची त्वरीत कृतिशिल अंमलबजावणी करावी. देवदासी प्रथा बंदी २००५ चा कायदा रद्द करावा. प्रथम पुनर्वसन करावे मगच कायदा करावा. प्रत्येक महिन्याला देवदासींना विनाविलंब अनुदान वितरण करावे अनेक जाचक अटी रद्दबातल कराव्यात. ३५ पानी अनुदान मागणी अर्ज रद्द करावा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील देवदासी विधवा वयोवृध्द, अंपग, निराधारांना देण्यात येणारा मानसिक त्रास, हेलपाटे त्वरीत थांबवून विनात्रास त्यांना वेळेवर घरपोच मनीऑर्डरद्वारे अनुदान द्यावे या आणि इतर प्रलंबित न्याय मागण्याच्या निषेधार्थ शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता कोल्हापूरातील हजारो देवदासीचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाण्याचा निर्णय आज झालेल्या कोल्हापूरातील देवदासींच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला अध्यक्षस्थानी मा. नगरसेवक अशोकराव भंडारे हे होते. या बैठकीत मा. नगरसेविका, सौ. मायादेवी भंडारे, श्रीमती यल्लव्वा कांबळे, आक्काताई मोरे, माधवी आवळे, रेखा वायदंडे, मालनताई भोरे, अलका बनसोडे, सारीका कांबळे, सविता पुजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शुक्रवार दि. ३१ रोजी अन्यायग्रस्त आंदोलक देवदासी महिलांनी सकाळी ११.०० वाजता दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन यावेळी अशोकराव भंडारे यांनी केलेल आहे.
जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात 
