Share Now
वाठार (प्रकाश कांबळे)
वाठार ता हातकणंगले येथील विविध विकास कामासंदर्भातील निवेदन वारणानगर येथे वारणा विविध उद्योगसमूहाच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशु संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना वारणा दुध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी सादर केलेया निवेदनामध्ये वाठार गावातील गेली 10 वर्ष रिक्त असणारे पोलीस पाटील पद त्वरित भरावे तसेच चावडी साठी जुनी इमारत जीर्ण व मोडकळीस आली आहे तरी नवीन इमारत बांधकामासाठी निधी मिळावा, गट नं 521/7 मधील 2 हेक्टर जागा मुलांना खेळण्यासाठी व क्रीडांगणासाठी मिळावी, गट नं 113 ब मधील 4 हेक्टर जागा घनकचरा प्रकल्पासाठी मिळावी अशी मागणी महेंद्र शिंदे यांनी केली आहे यावेळी आमदार डॉ विनयरावजी कोरे सावकर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मा जि सदस्य अशोकराव माने, वारणा दूध संचालकमिलिंद हिरवे,राजवर्धन मोहिते, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते
Share Now