विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापुर : राजस्थान राज्यामधील जालोर या गावातील दलित मुलगा इंद्रकुमार मेघवाल याची अमानुष पणे झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.इंद्रकुमार अवघा ९ वर्षांचा लहान मुलगा होता. मुख्याध्यापकाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा आर पी आय तर्फे दसरा चौक येथे निदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना आर पी आय कोल्हापूर जिल्ह्याचे नेते सतीश माळगे म्हणाले की
सर्वांसाठी ठेवलेल्या माठातून पाणी पिल्यामुळे तेथील मुख्याध्यापकाने त्यास बेदम मारहाण केली, मारहाणीत तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा दि. १३/०८/२०१२ रोजी मृत्यु झाला. सदर मुख्याध्यापकाने पाण्यासाठी बालकास अमाप धारण केलेली आहे व त्या मारहाणीत इंद्रकुमार मेघवाल हा मयत झाला.
इंद्रकुमार मेघवा दलीत असल्याने तो सर्वांसाठी असलेल्या पाण्याच्या माठातून पाणी पिल्यामुळे, पाणी का पिलास यावरून त्याला अत्यंत निर्दय पणाने मारहाण करण्यात आली. त्यामधे त्याच्या मृत्यु झाला.ही अतिशय निंदनीय गोष्ट.आहे अशा या निर्दयी मुख्याध्यापकाला फाशीची ची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आर पी आय कडून करण्यात येत आहे.
जलद गतीने खटला चालवून त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच इतके भयंकर कृत्य घडलेल असताना देखील तेथील राज्य सरकार आरोपी यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करण्याच्या तयारीत दिसून येत नाही, तसेच राजस्थानमध्ये दलितांवर अत्याचार वाढत आहेत व ते अत्याचार रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे सदर सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आम्ही ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आ) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी आर पी आय चे संतोष कांबळे, आमर धाबाडे, बाळासो कांबळे,तुषार नाईकनवरे,अविनाश पाटील,संदीप मदाळे, रुपेश आठवले,प्रशांत पाटील,भरत पासवान,बबन शिंदे,युवराज गुरव,सनी वाचणे,अभिजीत कांबळे,अविनाश कांबळे, गौतम कांबळे,चेतन कांबळे, शिरीष थोरात इत्यादी उपस्थित होते.