अतिवृष्टी मुळे कोल्हापुरातील खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्ती साठी निधी देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले…!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून रु. १०० कोटी तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी रु. ५० कोटी व इचलकरंजी महानगरपालिकेसाठी रु. २५ कोटी निधी मिळावा यासाठी आज जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन देण्यात आले.सध्या अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग, ग्रामीण मार्ग तसेच गावांतर्गत असणारे रस्ते तसेच व महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते अत्यंत खराब झाले असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते विकासासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करण्याची विनंती केली.

Advertisements

यावेळी, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत गणेशउत्सवाच्या पूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करून घेण्याचे आदेश दिले असून यासाठी रु. ५ कोटींचा निधी सुद्धा तात्काळ मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *