प्रतिनिधी/ कुपवाड शहरातील शमीम जाकीर मुजावर या विद्यार्थिनीची “आयर्लंड” येथे मास्टर ऑफ सायन्स इन सायबर सिक्युरिटी या उच्च शिक्षणाकरिता निवड झाली आहे. कुपवाड शहर व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शमीम मुजावर विद्यार्थिनीचे प्राथमिक शिक्षण हे शहरातील न्यु प्रायमरी स्कूलमध्ये झाले. पदवीपर्यंत शिक्षण वडील नोकरी निमित्त पेटवडगाव ला असल्यामुळे त्या ठिकाणी झाले. डिप्लोमा चे शिक्षण गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कोल्हापूर या ठिकाणी झाले. तदनंतर संजय घोडावत इन्स्टिट्यूट (अतिग्रे) मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तिने इंजिनिअरिंगची पदवी घेतली. तदनंतर कॅम्पस इंटरव्यू द्वारे तिचे सिलेक्शन टाटा इन्स्टिट्यूट मध्ये झाले होते. नोकरी करत असताना परदेशात उच्च शिक्षणाची घेण्याची जिद्ध असल्यामुळे तिने नोकरी करत करतच अभ्यास सुरू ठेवला नुकत्याच झालेल्या टेनटरेस्ट एक्झाम मध्ये तिची आयर्लंड येथे मास्टर इन सायन्स सायबर सिक्युरिटी उच्च शिक्षण घेण्यासाठी निवड झाली त्यानिमित्त तमाम कुपवाड मुस्लिम बांधवांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
शमीम मुजावर हिची उच्च शिक्षणासाठी आयर्लंड येथे निवड…

Read Time:1 Minute, 49 Second