कोल्हापूर : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी येथे संस्थेचे संस्थापक अधिष्ठाता प.पू. भद्रबाहू स्वामीजींची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प. पू. भद्रबाहू स्वामीजींनी घालून दिलेला आदर्श आणि संस्काराने आज आदर्श पीढी घडवण्याचे कार्य गोमटेश परीवार करत आहे. अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे विद्यार्थी गोमटेशने घडवले आहेत. असे प्रतिपादन उदय पाटील यांनी केले. आज स्वामींजींच्या जयंती दिनी ‘पढाई’ या नवीन उपक्रमाची घोषणाही त्यांनी केली. हा उपक्रम विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता तर वाढवेलच पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या ताणतणावावर नियंत्रण ही ठेवण्यात यशस्वी होईल. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधणारा हा उपक्रम वर्षभर सुरू राहील. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली देशमाने यांनी केले. तर स्वागत दीपाली जोशी यांनी केले. शेवटी ज्योती हरदी यांनी आभार मानले. कार्यक्रमास स्वाती चव्हाण, प्राची शहा, महानंदा बक्कनावर, अश्विनी हत्ती, सन्मती पाटील, अमित चव्हाण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.