राज्यस्तरीय सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात…!
आमदार सतेज पाटील यांनी केली क्रीडांगण, बैठक व्यवस्था इत्यादी बाबत पाहणी.....!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 39 Second

कोल्हापूर : “राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष २०२२” निमित्ताने कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटना मार्फत राज्यस्तरिय सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे. तब्बल २० वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला राज्यस्तर सब- ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यामध्ये १३ वर्षाखालील मुलींमध्ये २४ संघ तर मुलांमध्ये ३० संघ सहभागी होणार आहेत. 

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंना चांगले क्रीडांगण उपलब्ध व्हावे म्हणून आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराजयमंत्री, माजी पालकमंत्री तसेच कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी क्रीडांगण, बैठक व्यवस्था इत्यादी बाबत पाहणी केली. यावेळी उपाध्यक्ष नितीन दलवाई आणि हितेश मेहता, माजी उपमहाौरपद संजय मोहिते, सेक्रेटरी डॉ शरद बनसोडे, डॉ सुरेश फराकटे, डॉ. राजेंद्र रायकर, मानसिंग पाटील, विनायक साळोखे, जेसिका अँड्र्यूज, सचिन पांडव, संदीप खोत, वंदना पाटील, अमित दलाल, केदार सुतार, उदय पाटील, तेजस्विनी महाडिक, नारायण पाटील, परेश नायकवडे, शुभम पाटील, अनिरुद्ध विटेकर, आकाश जाधव.

सदर स्पर्धा छ. शहाजी लॉ कॉलेज बास्केटबॉल ग्राउंड, पॅव्हेलीन ईमारत बावडा, कृषी विद्यापीठ बास्केटबॉल, बास्केटबॉल ग्राऊंड या ठिकाणी होणार आहे.सर्धेचा उदघाटना सोहळा दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता व बक्षीस समारंभ १ नोव्हेंबर रोजी छ शहाजी लॉ कॉलेज बास्केटबॉल मैदान येथे होणार आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *