झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली येथे झिल उत्सव २०२२ मोठ्या दिमाखात संपन्न…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  

  सांगली : “उत्सव हे जीवनाला उत्कटतेने आणि उद्देशाने प्रेरित करून ते मानवी आत्म्याला उल्हासित करतात.”हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली मध्ये १९ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ ते रात्री ८ च्या दरम्यान झील उत्सव चे आयोजन करण्यात आले होते. स्कुल कॅम्पस संपूर्ण दिव्यांनी सजले होते, कला आणि कला विद्याशाखांच्या सुंदर प्रदर्शनांनी कॉरिडोरवर रांगोळी काढली होती, फुलांनी आणि प्रकाशाने सजवले होते. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता रांगोळी स्पर्धेने झाली आणि कनिष्ठ महाविद्यालयातील २० स्पर्धकांनी वर्तमानातील ज्वलंत आणि विश्वाविषयी गंभीर समस्या या थीमवर आधारित रांगोळी काढली होती.

 झील उत्सवचे उद्घाटन सांगली कॅम्पस संचालक मा. संजय महाडिक सर यांचे शुभ हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी मा. प्राचार्या सौ. मेघाली नरगच्चे मॅडम., प्रशासकीय अधिकारी अभय भिलवडे सर, विज्ञान समन्वयक डॉ.अल्विन सिंग सर आणि वाणिज्य समन्वयक सौ. नेहा सारडा मॅडम हे प्रमुख उपस्थित होते.  शाळेने स्टॉल्सच्या आधारे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या अग्रगण्य कार्यक्रमामागील हेतू इतकाच की , विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, अनुभव घ्यावा, साहस दाखवावा, आनंद घ्यावा आणि स्वतःच्या करमनुकीसह कमाई करण्याची कल्पकता लक्षात यावी.

      सायंकाळी ४.३० वाजता संगीत मैफल रंगली.संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुंदर आणि मधुर गाण्यांनी केली आणि या गाण्यांना विध्यार्थी आणि श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. विज्ञान समन्वयक डॉ.अल्विन सर यांनी तमिळ भाषेत गायलेल्या गाण्यांनी विशेष वाहवा मिळवली .झिल उत्सवमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केलेले होते व त्यातील विजेत्यांना पारितोषक देऊन गौरविण्यात आले.

  झिल उत्सवामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई बरोबरच लहान मुलांच्यासाठी छोटा पाळणा, रेल्वे , स्लायडर सह प्रत्यक्षात प्ले स्टेशन मैदानावर उभे केले होते. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी जवळपास ७५ विविध स्टॉल लावले होते . विविध कल्पक खेळ , लकी ड्रॉ , खाण्याचे विविध पदार्थ यासह स्टेषनरी वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल व सेल्फी स्टॉल यांनी पालकांचे लक्ष वेधून घेतले. झिल परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे सुंदर व नेटके नियोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *