कोल्हापूर : गेली कित्येक वर्षे कर्नाटक सरकार विरोधात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. मराठी भाषिक सीमा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी,कोल्हापुरहुन निघालेल्या शिवसेनेच्या मशाल यात्रेला,कर्नाटक पोलिसांनी जबरदस्तीने अडवून धरल्याने वातावरण तणापूर्ण बनले होते.
दरम्यान शिवसेना जिंदाबाद… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… संयुक्त महाराष्ट्र झालाच अशा घोषणा देत,संतप्त शिवसैनिकांनी दूधगंगा नदीच्या पुलावर ठिय्या आंदोलन करत,पुणे बेंगलोर राष्ट्रीय मार्ग सुमारे तासभर रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती.अखेर सीमाभागात जाणा-या दुधगंगा नदीलाच वंदन करून, शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार आणि कर्नाटक पोलिसांचा तीव्र निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून,परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे,शहरप्रमुख रविकिरण इंगवले, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, अरविंद नांगनुरी,सचिन गोरले,दिलीप बैलूरकर,प्रवीण तेजम,राजकुमार बोकडे,पिराजी शिंदे,विजय सावंत,अरविंद कुलकर्णी,सतीश मोरशे,करवीर तालुका प्रमुख राजू यादव,प्रभाकर खांडेकर, पोपट दांगट,मंजित माने,विकास बुरबुसे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.