विभागीय कार्यालयाअंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामांची व दर्जांची पाहणी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 13 Second

कोल्हापूर : शासनाच्या व महानगरपालिकेच्या निधीमधून शहरातील विविध रस्त्यांची ठेकेदारामार्फत कामे करण्यात येतात. यामध्ये मुलभूत सेवा सुविधा अनुदानातील ५८ कामे आहेत तर महापालिकेच्या स्वनिधीमधून डांबरी पॅचवर्कची ७ कामांना मंजूरी देण्यात आली होती. या रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी विभागीय कार्यालयाअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची व दर्जाची पाहणी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. यामध्ये शहरातील विविध रस्त्यांची कामे मंजूर होऊन पुर्ण झालेली आहेत. परंतु या रस्त्यावर खड्डे पडून रस्ते खराब झालेले आहेत. काही कामांच्या दोष दायित्व (DLP) कालावधीमध्ये काही रस्ते खराब झालेले आहेत. ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत. यासाठी विभागीय कार्यालय क्रं.१ अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे अनुदानातील २७ कामांची व मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनिल काटे यांच्याकडे अनुदानातील ९ कामाची व पॅचवर्कच्या २ कामांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. विभागीय कार्यालय क्रं.२ अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे अनुदानातील १० कामांची व पॅचवर्कच्या एका कामांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. विभागीय कार्यालय क्रं.३ अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे अनुदानातील ८ कामांची व पॅचवर्कच्या २ कामांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. विभागीय कार्यालय क्रं.४ अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी यांच्याकडे अनुदानातील ४ कामांची व पॅचवर्कच्या २ कामांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या सर्व मंजूर कामांची संबंधीत अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करुन कामाचा दर्जा व सद्यस्थितीबाबत जीओ टॅग फोटोसह ३ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या आहेत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *