Share Now
विशेष वृत्त कौतुक नागवेकर
सांगली : खाजगी क्षेत्रात खाजगी हॉस्पीटल, लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंडस्ट्रीयल इस्टेट, माधवनगर रोड, सांगली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये नियमीत व ॲप्रेंटीसची ३९३ पदे भरण्यात येणार असून यामध्ये विविध नामवंत कंपन्यांनी/आस्थापनांनी सहभाग नोंदवला आहे. एस.एस.सी, एच.एस.सी, बीएस्सी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आयटीआय, डिप्लोमा, बीई इत्यादी शैक्षणिक पात्रतेची पदे भरण्यात येणार असून उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.
Share Now