स्थापत्य क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हि उज्ज्वल भवितव्याची नांदी: अल्फाज मंकड

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 27 Second

कोल्हापूर:  स्थापत्य क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हि उज्ज्वल भवितव्याची नांदी असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्थापत्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत असे मत अहमदाबाद येथील  एस. एस.  जिओसिस्टीम्स् चे श्री.अल्फाज मंकड  यांनी व्यक्त केले ते कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथील  मयुरा-एआयसीटीई आयडिया लॅब  आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त आयोजनातून कोल्हापूर आणि परिसरातील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, सिव्हील इंनिनिअर्स यांच्यासाठी अत्याधुनिक अशा ३D लेजर स्कॅनर आधारीत स्कॅन टू बिम ऍप्लिकेशन  कार्यशाळेत प्रमुख प्रशिक्षक म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर असोसिएशन ऑफ आर्कीटेक्ट इंजिनिअर्स अध्यक्ष अजय कोराणे, संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी व कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 या कार्यशाळेसाठी असोसिएशन ऑफ आर्कीटेक्ट इंजिनिअर्स कोल्हापूरचे पदाधिकारी , प्रसिध्द् वि.जी.शिर्के कंपनीचे पदाधिकारी तसेस प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांनी आपली उपस्थिती नोंदविली. या कार्यशाळेमध्ये पुणे, नाशिक येथिल अभियांत्रिकी प्राध्यापक देखील सहभागी झाले. उद्योजकांची गरज ओळखून नव्याने उभारलेल्या  आणि उद्योजक व एआयसीटीई, दिल्ली यांच्या  संयुक्त निधीतून तयार झालेल्या मयुरा एआयसीटीई आयडिया लॅब मध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली. स्थापत्य अभियांत्रिकी मधील आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानासाठी उपयुक्त अशा थ्री डी स्कॅनर चा वापर व त्याचे फायदे याविषयावर अहमदाबाद येथील  एस एस जिओसिस्टीम्स् चे श्री.अल्फाज मंकड यांनी या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले व  प्रशिक्षण सहभागी प्रशिक्षणार्थीना  दिले. या प्रशिक्षणाच्या औचित्याने थ्री डी स्कॅनरची गरज किल्ले पुर्नबांधणी, पुर्ननिर्माण प्रकल्प आणि अचुक माहिती संकलणासाठी होईल अशी माहिती असोसिएशन अध्यक्ष श्री अजय कोराणे यांनी दिली. अशा पध्द्तीची आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञान  उपलब्ध करुन देण्याबद्दल केआयटी नेहमीच अग्रेसर राहील अशी ग्वाही संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.कार्जिन्नी यांनी दिली.

याच तंत्रज्ञानावर आधारीत बीम टेक्नॉलॉजी हा पदविका अभ्यासक्रम स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे गेले दोन वर्ष राबविला जात असून या अभ्यासक्रमामध्ये स्कॅन टू बीम हा विषय शिकविला जातो अशी माहिती कार्यशाळेचे समन्वयक व बीम टेक्नॉलॉजीचे नोडल ऑफिसर डॉ.रोहन नलवडे यांनी  दिली.

या कार्यशाळेसाठी आयडिया लॅबचे डॉ. शिवलिंग पिसे, प्रा.सुभाष माने, स्थापत्य विभागाचे  प्रमुख प्रा.मोहन चव्हाण, संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी व कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी यांचे मार्गदर्शनन लाभले.  या उपक्रमास मिळाले. संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली व सचिव दिपक चौगुले यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

१) केआयटीमध्ये आधुनिक थ्री-डी स्कॅनर कार्यशाळेत प्रात्यक्षिकावेळी श्री.अल्फाज मंकड, मा. अजय कोराने, डॉ.मोहन वनरोट्टी ,डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, डॉ रोहन नलावडे, शिवलिंग पिसे, प्रा.सुभाष माने व सहभागी प्रशिक्षणार्थी 

२)  केआयटीमध्ये आधुनिक थ्री-डी स्कॅनर कार्यशाळेत मनोगत व्यक्त करताना मा. अजय कोराने, व्यासपीठावर श्री मोहन चव्हाण, डॉ रोहन नलावडेडॉ. मोहन वनरोट्टी ,डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी,

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *