अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड धम्मभूमी लोकार्पण सोहळा उत्साहात व अभूतपूर्व वातावरणात संपन्न

विशेष वृत्त प्रकाश कांबळे 

कोल्हापूर : गुगवाड तालुका जत जिल्हा सांगली येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धम्मभूमी उभारण्यात आली आहे. पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो ( पूर्णा बुद्ध विहार जिल्हा नांदेड ) यांच्या हस्ते व हजारो बौद्ध उपासक उपासिका यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात धम्मभूमीचा लोकार्पण सोहळा पार पडला चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील गुगवाड या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशी धम्मभूमी उभारण्यात आली आहेे.  यावेळी हजारो लोकांना उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी कन्नड मधून व अपूर्वा चंद्रकांत सांगलीकर यांनी मराठी तुन बौद्ध धर्माची दीक्षा व २२ प्रतिज्ञा दिली.

Advertisements

  अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून धम्मभूमी साकारली आहे खाजगी खर्चातून उभा केलेला हा देशातील पहिला प्रयोग आहे सांगलीच्या जत तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर गुगवाड या ठिकाणी सुमारे २० एकर क्षेत्रामध्ये भव्य दिव्य धम्मभूमी उभारण्यात आली आहे या धम्मभूमीवर आता बुद्ध विहार भिकू ट्रेनिंग सेंटर लायब्ररी यूपीएससी एमपीएससी ट्रेनिंग सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे बुद्धविहाराची इमारत १०० फूट बाय १०० फूट अशी दोन मजली उंच आणि ४० फूट बाय ४० फूट अशा आकाराची इमारत असून या ठिकाणी थायलंड वरून बारा फूट उंचीची पंचधातूच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे या सोहळ्यासाठी सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर जिल्हा सह भारत देशातुन व शेजारच्या कर्नाटक राज्यातून हजारो बौद्ध बांधव उपस्थित होतेे. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी केले तसेच हजारो लोकांना भोजनदान करण्यात आले कार्यक्रमाच्या सांगता समारंभ वेळी उपस्थित भिखू संघाला चिवरदान करून धम्मपालन गाथा घेऊन उद्योगपती सीआर सांगलीकर यांनी उपस्थित लोकांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *