कोल्हापूर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या काल रात्री कोल्हापूर येथे आल्या असून त्यांच्या महाप्रबोधन यात्रेस सुरुवात झाली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा कोल्हापूर येथे निर्धार मेळावा होणार आहे. कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले सभागृह मध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलं आहे.
राज्यात सत्तेवर असणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकरी उद्योजक, सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणण्यासाठी केलेलं नियोजन हाणून पाडण्यासाठी आणि शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा खूपच लाजीरवाणी आहे. त्याचा पर्दाफाश करण्यासाठी दृष्टिकोनातूनच उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.