सुबोध भावेमुळे रचलं गेलं पहिलं मराठी वाढदिवसाचं गाणं..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:7 Minute, 32 Second

Media Control Online

वाढदिवासाच्या शुभेच्छा इंग्रजी किंवा हिंदी गाण्यातून देण्याऐवजी मराठी गाण्यांतून का दिल्या जाऊ नयेत? हा प्रश्न अभिनेता-दिग्दर्शक, निर्माता सुबोध भावे याने अनेक कार्यक्रामांतून उपस्थित केला. या प्रश्नावर गांभीर्याने विचार करत मराठी संगीत दिग्दर्शक आर. विशालने वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी गाणं लिहून, रचून आणि संगीतबद्ध तयार केलं. “जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा… मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा” असे त्या गाण्याचे बोल असून त्या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकताच सुबोध भावेचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने सुबोध भावेच्या चाहत्यांनी आर. विशालने तयार केलेल्या मराठी गाण्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सवर स्टोरीज तयार केल्या होत्या. सुबोध भावेने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर त्या स्टोरीएस रिपोस्टही केल्या आहेत. कोणाच्याही वाढदिवसाला केक कापताना ‘ हॅपी बर्थ डे टू यु’ किंवा ‘बार बार दिन ये आये…’ हे गाणं आनंदाने म्हटलं जातं. पण त्या ऐवजी “जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा… मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा” हे गाणं म्हणून केक कापता येईल. 

आर. विशाल गेल्या १२ वर्षांपासून मराठी संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. ‘झी मराठीवरची लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’चे शीर्षक गीत त्याने लिहिलंही होतं आणि संगीतबद्धही केलं होतं. ‘झी युवा’ वरील हृता दुर्गुळेची लोकप्रिय मालिका ‘फुलपाखरू’ या मिलिकेतील २० गाणी आर. विशाल संगीतबद्ध केली होती. ‘लव्ह, लग्न लोचा’, ‘इल्युझन’ आणि ‘मीटर डाऊन’ या वेब सिरीजची शीर्षक गीतं आर. विशालने तयार केली आहेत. विशालची गाणी सोनू निगम, स्वानंद किरकिरे तसेच अरमान मलिक यांनी गायली आहेत. विशालच्या वाढदिवसाचं मराठी गाणं या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाविषयी विशाल सांगतो, “अनेकदा वाढदिवसाचा केक कापताना ‘हॅपी बर्थ डे टु यू’ किंवा ‘बार बार दिन ये आये’, नाहीतर ‘मेरे भाई का बर्थ डे’ सारखी गाणी म्हणून केक कापला जातो. प्रत्येकाने वाढदिवस साजरा करताना त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतील वाढदिवसावर रचलेली गाणी म्हणून वाढदिवस साजरा का केला जात नाही हा प्रश्न मला सतावत होता. काही महिन्यांपूर्वी सुबोध भावे सहजच म्हणून गेले की, मराठी भाषेत वाढदिवसावर रचलेले गाणे तयार झाले पाहिजे. मग ठरवलं की, यावर विचार केलाच पाहिजे. दोन दिवसांत गाणं लिहून, रचून तसेच संगीतबद्ध करून तयार केलं. मी माझ्या मित्र परिवारात ते व्हायरल केलं. खूप जणांना आवडलं. काहींनी तर त्या वाढदिवसाच्या स्टोरीज तयार करून त्या पोस्ट केल्या. नुकताच सुबोध भावेंचाही वाढदिवस झाला. त्यावेळेसही मी रचलेल्या गाण्यावर स्टोरीज तयार करून सुबोध भावेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे आता “जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा… मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा” हे गाणं म्हणून केक कापता येईल. ”  

 

विशाल पुढे असंही सांगतो, ” “जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा… मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा” या मी तयार केलेल्या गाण्याचं सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गाण्याचे शब्द खूप सहज आणि सोपे आहेत. ते पटकन ओठांवर रेंगाळतील अशीच गाण्याची रचना केलेली आहे. ‘हॅपी बर्थ डे टु यू’ किंवा ‘बार बार दिन ये आये’, नाहीतर ‘मेरे भाई का बर्थ डे’ या गाण्यांचं गारुड आजही समाजमानवार आहे. त्यातही मराठी गाण्यावर वाढदिवस साजरा करताना केक कापावा, इंस्टवर स्टोरी व्हावी हे अपेक्षा करणं म्हणजे पारंपरिकतेत काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला माहित नाही की माझ्या या प्रयॊगाला, प्रयत्नाला किती प्रतिसाद मिळेल? पण आज जगभरात १२ कोटी मराठी बांधव आहेत. त्यांनी “जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा… मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा” हे मराठी गाणं त्यांच्या वाढदिवसादिवशी म्हटल्यास, या गाण्यावर इन्स्टा, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर वाढदिवसाच्या स्टोरी तयार केल्यास नक्कीच काहीतरी नवा पायंडा पाडला जाईल.” 

आर. विशालच्या या अनोख्या प्रयोगाचं कौतुक करताना सुबोध भावे म्हणतो, “काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सहज म्हणून म्हणून गेलो की, मराठी गाण्यांवर वाढदिवस साजरा झाला पाहिजे. म्हणजे मराठी भाषेत वाढदिवसाची गाणी नाहीयेत असं नाही.असतीलही. पण आता आता गरज आहे सहज लक्षात राहील आणि कॉन्व्हेंट शाळेतून शिकलेल्या मराठी मुलाच्याही चटकन तोंडी राहील अशा मराठी गाण्याची. तीन महिन्यांपूर्वी विशालने माझं म्हणणं मनावावर घेतलं. दोन दिवसांत गाणं स्वत: लिहून, संगीतबद्ध करून तयार केलं. अतिशय सोपं गाणं आहे. प्रत्येकाला आठवेल असंच गाणं आहे. प्रत्येकाने त्या गण्याचा उपयोग केला पाहिजे.”

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *