Share Now
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंचगंगा घाटकडे प्रयाण. ४.१० वाजता पंचगंगा घाट येथे आगमन व पंचमहाभुते आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन लोगोचे अनावरण व पंचगंगा महाआरती. ४.४०वाजता मोटारीने नरंदे, ता. हातकणंगलेकडे प्रयाण. ५.२५ वाजता नरंदे, ता. हातकणंगले येथे आगमन. ५.३० वाजता शरद सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. ५.४५ वाजता नरंदे येथून मोटारीने विक्रमसिंह क्रीडांगण, जयसिंगपूर, ता. शिरोळकडे प्रयाण. ६.१५ वाजता शेतकरी मेळावा व जाहिर सभा. (स्थळ : विक्रमसिंह क्रीडांगण, जयसिंगपूर) ७.१५ वाजता जयसिंगपूर येथून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री ८ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मोपा विमानतळ, गोवा राज्याकडे प्रयाण
Share Now