शिवाजी विद्यापीठात कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा संपन्न…!

विशेष वृत्त अजय शिंगे-काजल बुवा

  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव अध्यासन केंद्रात कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यासानाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी आजच्या कॅमेरा हँडलिंग कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले बी न्यूज चे सीनियर कॅमेरामन प्रशांत आयरेकर आणि पुढारी डिजिटल चे कॅमेरामन रवींद्र बागल यांची विद्यार्थ्यांशी ओळख करून दिली.

     कार्यक्रमात पुढे बोलताना  डॉ. शिवाजी जाधव म्हणाले की ‘प्रशांत आयरेकर यांना कॅमेरा हँडलिंग मध्ये प्रदीर्घ असा २० वर्षांचा अनुभव आहे. आजच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळतील.’ रवींद्र बागल यांच्याबद्दल माहिती देताना म्हणाले की ‘ रवींद्र बागल हे पुढारी डिजिटल मध्ये कॅमेरामन,व्हिडिओ एडिटिंग आणि स्टुडिओचे काम पाहतात.’ 

 या कार्यशाळेस  कॅमेरामॅन प्रशांत आयरेकर आणि रवींद्र बागल यांनी कॅमे-याचे कार्य, कॅमेरा वापरण्याची वेगवेगळी तंत्र, कॅमे- यात असणारे वेगवेगळे भाग यासंबंधीचे सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये करीअर करताना आपल्यात कोणते गुण असणे आवश्यक आहेत, कोणत्या गोष्टी खास करुन केल्या पाहीजेत यासंबंधी योग्य माहिती दिली. प्रत्यक्ष फोटोग्राफी करताना आपल्या हातांचे आणि स्टोरी कार्य कसे हवे यासंबंधीचे प्रात्यक्षिके त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवलीत. आणि विद्यार्थ्यानं कडून प्रात्यक्षिके करून देखील घेतलीत

कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देखील त्यांनी दिली. यावेळी प्रा.डॉ.रत्नाकर पंडित, पुढारी ऑनलाईन चे संपादक मोहसीन मुल्ला, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. डॉ.आलोक जत्राटकर,मतीन शेख, अक्षय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *