फुटबॉलपटू निखीलच्या उपचाराची सर्व जबाबदारी डी.वाय.पाटील ग्रुपची :आमदार ऋतुराज पाटील…!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 42 Second

कोल्हापूर : मेंदूची शस्त्रक्रिया झालेला कोल्हापुरातील नामवंत फुटबॉलपटू निखील खाडे हा बरा होईपर्यतची उपचाराची सर्व जबाबदारी डी. वाय. पाटील ग्रुप उचलेल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यानी दिली. आज तज्ञ डॉक्टरांसह कुटुंबियां सोबत नातेवाइकांशी निखीलवरील उपचारा बाबत सविस्तर चर्चा केली. डॉ. संजय डी. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील ग्रुप निखिलच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने सव्वा लाख रुपयांची मदत निखिलच्या वडिलाकडे देण्यात आली.

  कोल्हापुरातील ख्यातनाम फुटबॉल खेळाडू आणि दिलबहार तालीम मंडळाचा गोलकीपर निखिल खाडे याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी तात्काळ सिटी हॉस्पिटलमध्ये त्याची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच गेली आठ दिवस ते त्याचे कुटुंबीय आणि डॉक्टर यांच्याशी सातत्याने संपर्कात होते .

-डी. वाय. पाटील अभियांत्रिकीकडून सव्वा लाखाची मदत

   गुरुवारी आमदार पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांशी मेंदू वरील तज्ञ डॉक्टरांसोबत निखिलच्या प्रकृतीबाबत सविस्तर चर्चा केली. त्याच्या उपचार व खर्चाची कोणतीही काळजी करू नये. ती जबाबदारी आम्ही घेऊ. कुटुंबीयांनी त्याला भक्कम मानसिक आधार द्यावा, असे आमदार पाटील यांनी त्यांना सांगितले. यावेळी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्टाफने सव्वा लाख रुपयांची मदत निखिलचे वडील दिलीप खाडे यांच्याकडे दिली. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे,प्राचार्य डॉ.महादेव नरके रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डी. डी. पाटील, मेंदू तज्ञ डॉ. उदय घाटे, दिलीप खाडे, अॅड. अभिजित नलवडे, पवन पाटीलअजित पाटील, प्रा.योगेश चौगले, विराज पसारे, अर्जुन पोवाळकर, अक्षय भोसले, आदी उपस्थित होते.

निखिलला मानसिक आधार देऊया 

 कोल्हापूर ही क्रीडा नगरी असून फुटबॉल हा येथील श्वास आहे. सर्वाचा लाडका फुटबॉलपटू निखिल खाडेच्या पाठीशी डी. वाय. पाटील ग्रुप भक्कमपणे उभा आहे. मात्र, या काळात त्याला खरी गरज आहे ती मानसिक आधाराची. त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करूया. तसेच प्रोत्साहित करून त्याला मानसिक बळ देऊया. आपल्या सर्वांच्या सदिच्छा निखिलला निश्चितपणे या संकटातून बाहेर काढण्यासाठी बळ देतील.

डीवायपी ग्रुपमुळे मिळाला भक्कम आधार

निखीलवर शस्त्रक्रिया झाल्याचे कळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी तातडीने रूग्णालयात येऊन त्याची विचारपूस केली. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून आ.पाटील यांनी आम्हाला आर्थिक पाठबळ तर दिलेच पण कोलमडून पडलेल्या आमच्या कुटुंबाला धीर देत भक्कम आधार दिला. सातत्याने ते आमच्या व डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. आमदार पाटील व डी. वाय. पाटील ग्रुपच्या भक्कम पाठबळामुळे ही लढाई धीराने लढत आहोत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *