कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजता हॉटेल सयाजी येथे आगमन व ८.३० वाजेपर्यंत राखीव. रात्री ८.३० वाजता अंबाबाई मंदिराकडे प्रयाण. ८.४५ वाजता महालक्ष्मी दर्शन.रात्री ९.१५ वाजता डॉ. प्रताप सिंह जाधव यांच्या निवासस्थानी भेट. रात्री १०.१५ वाजता हॉटेल सयाजीकडे प्रयाण व मुक्काम.
शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता विमानतळाकडे प्रयाण.९.१५ वाजता कोल्हापूरहून हुबळीकडे प्रयाण. दुपारी १ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी १.३० वाजता मजले हेलिपॅड, ता. हातकणंगले येथे हेलीकॉप्टरने प्रयाण.दुपारी १.३० वाजता मजले येथून मोटारीने नांदणी, ता. शिरोळ कडे प्रयाण. दुपारी २ ते २.३० वाजता राखीव.( स्थळ: चकोते ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीज) दुपारी २.३० वाजता चकोते ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीजच्या नवीन प्लांटचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३.३० वाजता नांदणी येथून श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, ता. शिरोळकडे प्रयाण. दुपारी ४ वाजता नृसिंहवाडी स्वामी दत्त देव संस्थान येथे आगमन व दर्शन. सायं. ५ वाजता मजले हेलिपॅड येथे आगमन. ५ वाजता हेलीकॉप्टरने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. सायं. ५.३० वाजता विमानतळ येथे राखीव. सायं. ५.३० ते ६ वाजता राखीव. सायं. ६.१५ वाजता शिरोली फाटा, कोल्हापूर येथे आगमन. ६.१५ वाजता कोल्हापूरच्या एनएच प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ७.३५ वाजता भीमा कृषी प्रदर्शनास भेट. ८.१५ वाजता कृषी प्रदर्शनाहून विमानतळाकडे प्रयाण. रात्री ८.३५ वाजता कोल्हापूरहून दिल्लीकडे प्रयाण.