महिलांच्या स्वच्छतागृहासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…..!

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना स्वच्छतागृह नसल्याने होणाऱ्या गैरसोयी बद्दल आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला व इतर संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. यावेळी सर्व महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जाऊन महिलांची व्यथा मांडत हात जोडून महिलांसाठी प्रशासनाला स्वच्छतागृह उभा करावी,असे आवाहन केले. शिवाय लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी अन्यथा आज मूक मोर्चा काढला आहे, मात्र उद्या तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृहाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी जुने स्वच्छतागृह पाडण्यात आले होते मात्र पडलेल्या स्वच्छतागृहाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून असल्याने महिला भाविकांसाठी तिथे तात्पुरती कोणतीच सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

Advertisements

यामुळे अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृहासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने शासनासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान मेन राजाराम मधील आणि परिसरातील अनेक शासकीय कार्यालय हे आता स्थलांतरित करण्यात येत असून त्या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी महिलांना सांगितले आहे.

यावेळी संजय पवार, विजय देवणे सुनिल मोदी’ मंजित माने’ शुभांगी पोवार , सुप्रिया पाटील, स्मिता सावंत, पूनम फडतरे, विशाल देवकुळे, सविता कानूरकर, राजेंद्र पाटील, वैष्णवी पाटील, लता पाटील, संगीता गौपले, सुनीता नरके, दीपाली शिंदे, शुभांगी पोवार, पोपट दांगट, सोनिया चव्हाण,काजल दुकांडे, सानिका दामुगडे, सिद्धी दामुगडे,मनाली जाधव, , गीता हसुरकर, प्रीती क्षीरसागर, कमल पाटील,मंगल पवार, अश्विनी देसाई, आशाताई कदम, माधुरी जाधव, सुरेखा गाडीवडर ,संध्या टिपूगडे आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *