“महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; कोल्हापूरला जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाची मंजुरी”

कोल्हापूर | प्रतिनिधी :राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सिंचन भवन येथे त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिकयांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी तालुक्यातील विविध सिंचन व विकासकामांबाबतचे सविस्तर निवेदन मंत्री महोदयांना सादर करण्यात आले.

याच प्रसंगी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत मुख्य अभियंता (जलसंपदा), कोल्हापूर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यालयाच्या स्थापनेमुळे जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार असून, स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा टप्पा मानला जात आहे.

राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, जलव्यवस्थापन आणि विकासकामांना यामुळे अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या निर्णयामुळे शेतकरी, नागरिक आणि संबंधित विभागांना प्रशासनाशी समन्वय साधणे अधिक सुलभ होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आणि कोल्हापूरला दिलेल्या प्राधान्याबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या वेळी- रवीश पाटील कौलवकर जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, कोल्हापूर व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *