कोल्हापूर, प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे इन्स्टॉलिंग ऑफिसर पीडीजी रो. नासिर बोरसदवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्या कार्यकारिणीने सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
क्लबच्या मावळत्या अध्यक्षा रो. अंजली मोहिते यांनी वर्षभरातील सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेतला. मागील वर्षाच्या सचिव रो. सविता पदे यांनी वार्षिक अहवाल सादर करत कार्यकारिणीने राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यानंतर पीडीजी रो. नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. यामध्ये रो. सविता पदे यांनी अध्यक्षा, रो. सीमा मालानी यांनी सचिव तर रो. हर्षदा नाईक यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर नव्या अध्यक्षा रो. सविता पदे यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली.
यावेळी मार्गदर्शन करताना पीडीजी रो. नासिर बोरसदवाला यांनी २०२५-२६ या वर्षात मावळत्या कार्यकारिणीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. विशेषतः “यामिनी” प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन, पर्यावरण संवर्धनाबाबत राबविलेले उपक्रम तसेच शालेय विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मार्गदर्शन हे क्लबच्या कार्याचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या कार्यकारिणीनेही समाजोपयोगी उपक्रमांची ही परंपरा अधिक प्रभावीपणे पुढे न्यावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
समारंभास पीडीजी रो. प्रताप पुराणिक, पीडीजी रो. संग्राम पाटील, पीडीजी रो. श्रीनिवास मालू, एजी रो. अरुंधती महाडिक, एजी रो. हर्षवर्धन तायवाडे पाटील, रो. विक्रांतसिंह कदम, रो. सुहास जोशी, रो. अमित माटे, रो. अमरदीप पाटील, रो. प्रसन्न देशिंगकर तसेच एजी रो. दीपिका मर्दा यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. मधुलिका जगदाळे, रो. दुर्गा भिंगार्डे, रो. जया माहेश्वरी आणि रो. सुजाता लोहिया यांनी केले. आभार प्रदर्शन रो. सीमा मालानी यांनी केले.
यावेळी मावळत्या खजिनदार रो. हेमलता कोटकर यांच्यासह रो. शोभा तावडे, रो. कल्पना घाटगे, रो. बीना जनवाडकर, रो. साधना घाटगे, रो. विशाखा आपटे, रो. गौरी शिरगावकर, रो. लक्ष्मी शिरगावकर, रो. मेघना शेळके, रो. गायत्री मेनन, रो. सुरेखा इंग्रोळे, रो. प्रिया आरगे, रो. सुप्रिया डोईजड, रो. गीता पाटील, रो. दीपिका कुंभोजकर, रो. आशा जैन, रो. ममता झंवर, रो. योगिनी कुलकर्णी, रो. अर्चना देशपांडे, रो. उन्नती सबनीस, रो. रेश्मा शहा, रो. रेखा सारडा, रो. शीतल मुथा, रो. मंजिरी मोरे, रो. रुपाली मिरजे, रो. शीतल लवटे, रो. नंदिनी पटोडिया, रो. प्रीती मेनन, रो. सविता उपाध्ये यांच्यासह रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सर्व सदस्या तसेच रोटरी मूव्हमेंटचे विविध क्लबचे अध्यक्ष, सचिव आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
