सेलक्युअर कॅन्सर सेंटर आणि सनराईज हॉस्पिटल यांचा केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना
आता कोल्हापुरातच उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. उपचारासाठी पुणे-मुंबई गाठण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, वेळ आणि खर्चाचीही बचत होईल.
या यशाबद्दल अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

