कोल्हापूर : कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे आयोजित भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात १० लाख शेतकरी व नागरीकांनी भेट दिली. शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन, खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो त्यामुळेच पुढील प्रदर्शन आणखी व्यापक प्रमाणात भरविण्यात येईल अशी घोषणा आयोजक खासदार धनंजय महाडिक यांनी आज भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी केली. पृदर्शनाला भेट दिलेल्या शेतकऱ्यांसह जनतेचे त्यांनी आभार मानले.
आज शेवटच्या दिवशी रविवार सुट्टी होती. त्यामुळे मेरी वेदर मैदानावर तुडुंब गर्दी झाली होती. चार दिवसात तांदळाची उंच्चांकी विक्री झाली महिलां बचत गटांनी उभ्या केलेल्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून ५० लाखांची उलाढाल झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भिमा कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल १२ कोटीची उलाढाल झाली आहे. विविध शेतीची साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.
शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी गेली १४ वर्षांपासून या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली.यावर्षीचे हे १४ वे प्रदर्शन २६ जानेवारीस सुरू झाले आहे. आज याची २९ जानेवारी रोजी सांगता अभूतपूर्व गर्दीत झाली.
चार दिवसात कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तोबा गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती.
भीमा कृषी प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित ४०० कंपन्याचा सहभाग होता. २०० महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविलेला सर्वात मोठा हरियाणातील १२ कोटीचा बादशहा नावाचा रेडा आणि ३१ लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनाची खास आकर्षण ठरत आहे.
याचबरोबर गाय आणि बैल या दोन्हीचा संगम असणारी खिलार जातीचा बैजा नावाचा पाच वर्षाचा पांढरा बैल व हरियाणा जातीची रेडी जी ३३ महिन्याची आहे मुऱ्हा जातीची १९ लिटर दूध देणारी म्हैस रावण नावाचा लाल कंधारी वळू जो नांदेड जिल्ह्यातील सुनेगाव येथील आहे ज्याने महाराष्ट्र चॅम्पियन दोन वेळा पटकावला आहे. तर अन्य स्पर्धांमध्ये त्यांने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. सर्जा नावाचा कपिला गीर आठ वर्षे सहा महिन्याचा दोन दाती बैल आहे जो कोपर्डी तालुका आजरा येथील आहे.८ लाख ५१ हजार किंमत असलेली १८.१ लिटर दूध देणारी पाच वर्षे वयाची मुऱ्हा जातीची म्हैस, इतर खोंड, जाफराबादी गायी,हँगस्टर जातीचे उंदीर, व ७० व ५० किलो वजनाचा उस्मानाबादी बकरा, कडकनाथ कोंबड्या लव बर्ड आफ्रिकन फिशर, पपेट,पांढरे उंदीर ससे बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.याचबरोबर भीमा फार्म अँग्रोमधील पक्षी तर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस,खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरली.
शेतक-यांसाठी कृषि प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीची सोय करण्यात आली होती.
भीमा कृषी प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी डॉ. जे.बी. पाटील, सहायक प्राध्यापक, यांनी शेंद्रीय कर्न व जमीनीचे अरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. जमीनीतील कर्ब कसे वाचले पाहीजेत याबाबत सोनी यांनी सविस्तर माहीती दिली.
किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीड नियंत्रणाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यात खोड किडीसाठी ट्रायकोकार्ड, कामगंद सापळे व हुतगी नियंत्रणासाठी मेराऱ्यझियन या बुरशीचा वापर करावा असे किटकशास्त्रज्ञ डॉ.अभयकुमार बागडे यांनी सांगितले.
ऊस पिकामध्ये येणारे प्रमुख रोग, त्याची ओळख कश्याप्रकारे करावी तसेच ऊस पिकामध्ये जैविक खतांचा वापर करण्याच्या पद्धती यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथील डॉ.रविंद कारंडे यांनी केले.
एकरी सुरू लागान – २० kgपूर्व हंगामी- ३० kg व आडसाली – 4०kg २ हप्त्यात सेंद्रीय खत किंवा रासायनिक खताबरोबर मिसळून ऊसाच्या मुळाशेजारी रांगाळी पद्धतीने ऑरभिकम सुक्ष्म अन्नद्रव्य हे खत यावे अशी शिफारस करण्यात आली आहे.,असे सांगितले.
देण्यात आलेले पुरस्कार
चॅम्पियन ऑफ दि शो कडला सांगोला सोलापूर येथील खिलार खोंड याने पटकाविला आहे.
कृषि सहसंचालक, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील वंदूर या गावाच्या मातीत शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या व महाराष्ट्र शासन कृषि विभागात कृषि पर्यवेक्षक पदावर रुजू होऊन कोल्हापूर विभागाच्या कृषि सहसंचालक पदापर्यंत शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी गेली ३७ वर्षे कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठी अविरत प्रयत्नशिल असलेले महावीर कल्लाप्पा जंगटे यांचा भिमा कृषि जीवन कृषि विभागात विभागीय गौरव पुरस्कार- २०२३ देऊन सन्मानित करण्यात आले.
भिमा कृषि उत्कृष्ठ कृषिसंशोधक पुरस्कार
डॉ. राजेंद्र रघुनाथ सुर्यवंशी सहयोगी अधिष्ठाता तथा प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविदयालय, कोल्हापूर,डॉ. भिमराव मधुकर कांबळे सहयोगी प्राध्यापक, मृदा शास्त्र व कृषि रसायनशास्त्र, राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविदयालय, कोल्हापूर आणि हनुमंत रामचंद्र शिंदे सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविदयालय, कोल्हापूरचे यांना गौरविण्यात आले.
भीमा शेती भूषण पुरस्कार
वसगडेचे श्री. अजित बाबुराव सीदे,मु.पो. कोथळीचे नामदेव दत्तात्रय सितापे,मु.पो. दानोळीचे प्रशांत शशिकांत चंदोबा
मु.पो. वाघवेंचे सचिन कृष्णात उडाळे,मु. उचतचे विनोद प्रवीण बेर्डे आदींचा समावेश आहे.
भीमा आदर्श कृषी विस्तारक पुरस्कार
सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोग शास्त्र विभाग राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यालय रविंद्र अशोक कारंडे, कृषी सहाय्यक गडमुडशिंगीच्या सौ. स्मिता सतीश नावलगी, सुशिक्षत्री अधिकारी महाबीज कोल्हापूरचे फुलसिंग रोहिदास आडे,कृषी सहायक चिपरी तालुका शिरोळचे सुजाता मारुती हजारे यांचा समावेश आहे.
भीमा कृषी जिजामाता कृषी संशोधक पुरस्कार
सहाय्यक प्राध्यापक वनस्पती शास्त्र विभाग राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या डॉ. मनीषा सत्यवान मोटे, सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या डॉ.सीमा अरुण सरवदे
भीमा आदर्श शेतकरी पुरस्कार
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोनवडेचे श्री.शिवाजी सत्तापा पाटील,तारदाळचे राजेंद्र देवू बणे किणीच्या वैजू म्हातु कुटे,राशिवडेचे दिलीप उर्फ विष्णू पांडुरंग चौगले, धनगर मोळाचे सदानंद जाधव
भीमा आदर्श शेतकरी पुरस्कार
चांदेकरवाडीचे कुलदीप प्रकाश खोत,वाकरेचे महादेव भिकाजी पाटील,करडवाडीचे बजरंग गणपती सुतार,राधानगरीचे दीपक विट्ठल शेती,खानापूर भुदरगड येथील अभयसिह आनंदराव पाटील आदींना सन्मानित करण्यात आले तर बिनदाती अदात खिलार खोंड,चार दाती खिलार खोंड,सहादाती व पूर्ण दाती खिलार खोंड,खिलार गाय गट,खिलार कालवड,लाल कंधारी वळू गट,गाय गट, देवणी गाय गट,देवणी वळू गट,डांगी गाय गट,डांगी वळू गट,पुंगनूर गाय गट,मुऱ्हा रेडा,रेडी,मुऱ्हा म्हैस गट,कांकरेंज वळू गट,कपिला गीर वळू गट,पंढरपुरी रेडा गट,जाफराबादी रेडा गट व विविध जातीचे पक्षी यांना सन्मानित करण्यात आले.पीक स्पर्धेत वैशाली चौगुले यांनी मिळविला आहे टिटवे महादेव शामराव पाटील,कागल पुंडलिक कृष्णा डाफळे भाजीपाला भुदरगड विठ्ठल पांडुरंग पाटील वांगी पीक घेतले होते,अभिनव फार्म विदेशी ,श्रद्धा पाटील तृतीय क्रमांक
फुले गटात राजेंद्र बळवंत मोरे प्रथम क्रमांक,आप्पासो घाट विभागून प्रथम क्रमांक दिला आहे अनिता औद्योगिकर,उसपीके पुरस्कार देण्यात आले.तर शोध लोककलेचा सांस्कृतिक वारसा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रभर जी.आय मानांकित असणाऱ्या उत्पादनांचे प्रदर्शन भीमा कृषी प्रदर्शन येथे भरवण्यात आले होते.विविध तृणधान्यांच्या पौष्टिक तृणधान्य ओळख नमुन्याचा स्टॉल उभारणी करण्यात आलेली होती.
या प्रदर्शनाचे प्रभास फिल्मस हे मुख्य प्रायोजक होते. सहप्रयोजक निसर्गोपचार केंद्र प्रा.लि. व रिलायन्स पोलिमर्स हे होते. तर कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले. संयोजन भीमा उद्योग समूहासह खासदार धनंजय महाडिक व हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण यांनी केले होते.
भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात गेल्या चार दिवसात विक्री झालेला शेतमाल :
१) सेंद्रीय गूळ : २००० kg
२) इंद्रायणी तांदूळ : ३००० kg
३) आजरा घनसाळ : २५०० kg
४)रत्नागिरी २४ तांदूळ :- १५०० kg
५)दप्तरी तांदूळ :- ८०० kg
६) सेंद्रीय हळद : ९०० kg
७) जोंधळा जिरगा तांदूळ : १२०० kg
८) नाचणी : १००० kg
९)जंगल मध :- ७०० kg
१०)फणस व करवंद सरबत :- १००० लिटर
११)काकवी :- ७०० लिटर
१२)बेदाणे :- ५०० kg
१३)केळी :- २५० kg