कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली. ८० % समाजकारण आणि २०% राजकारण हा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. कोणतीही सत्ता नसताना शिवसेनाप्रमुखानी संघटना वाढविली. शाखांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम केले. त्याच पद्धतीने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनुसार मार्गक्रमण करून गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक अशा पद्धतीने शाखांची स्थापना करा. संघटना बांधणीतून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा नक्कीच जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचा गडहिंग्लज येथे नूतन ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मेळावा मेळावा आज पार पडला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेची स्थापना मुळातच मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी झाली. मुंबईमध्ये दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीयांचे प्राबल्य वाढत असताना मराठी माणसांच खच्चीकरण करण्यात येत होत. या होणाऱ्या गळचेपी विरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठविला. शिवसेनेची स्थापना करून उठाव लुंगी, बजाव पुंगी चा नारा देत. नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात मराठी माणसाला न्याय देत ताठ मानेने जगायला शिकवलं. शिवसेनाप्रमुखांनी संघटना वाढीसाठी शिवसेनेच्या शाखांचे जाळे निर्माण केले. शिवसेनाप्रमुखांचे आवडते शिष्य धर्मवीर आनंद दिघेंनी लोकांना न्याय देण्यासाठी आपल आयुष्य वेचल आणि शिवसेनेला खऱ्या अर्थाने निवडणुकीत यश मिळाले ते ठाण्यातून. याच धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार लोकहिताचे निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गेल्या काही महिन्यात घेतलेले लोकहिताचे निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा. सरकार शिवसेनेचं आहे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, शिवसेना हि आश्वासन देणारी संघटना नाही तर वचन देवून ते वचन पूर्ण करणारी संघटना आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत, तालुका, नगरपालिका पातळीवर आवश्यक निधी देवून लोकांना आवश्यक सोयीसुविधा देण्याचे काम करू.
नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी निवडणुकीतील वैरत्व विसरून समाजहिताच्या कामाकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मतदारांनी दिलेली जबाबदारी आप-आपल्या ग्रामपंचायतीचा विकास साध्य करून पूर्ण करण्याकडे भर द्यावा. जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत रहा जनता आपल्या पाठीशी उभी राहुल आपल्याला पाठबळ देईल. ग्रामपंचायतींच्या विकासासाठी शिवसेनेचे सरकार कटिबद्ध आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शाखांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. गावपातळीवर शाखांची बांधणी करून यामाध्यमातून संघटनेची बांधणी करा. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय समित्यांमधून शिवसैनिकांना न्याय देवू. त्यामुळे प्रामाणिकपणे संघटना बांधणीसाठी इच्छा आणि जिद्द ठेवून कार्यरत व्हावे, असे आवाहनही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष तालुका गडहिंग्लज यांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नवनियुक्त सरोळी गावचे सरपंच सौ.अस्मिता अशोक कांबळे, उपसरपंच, मारुती पाटील, सदस्य लीला आवडण, सविता देसाई, प्रभावती शिट्याळकर, कुंबळहाळ गावचे उपसरपंच बाळासो येणेचवंडी, सदस्य शरद पाटील, सचिन कांबळे, यशवंत पाटील, विठ्ठल पाटील, खमलेट्टी गावचे ग्रामपंचायत सदस्य शिवराज खैरे, सुनिता घुगरे, कविता कोरे, निलजी गावचे ग्रामपंचायत सदस्य अजयकुमार मजगी, बाळगोंडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर, उदय भोसले, किशोर घाटगे, गडहिंग्लज शहरप्रमुख अशोक शिंदे, तालुकाप्रमुख संजय संकपाळ, तालुका संपर्कप्रमुख सागर मांजरे, कागल तालुकाप्रमुख सुधीर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, अमोल नार्वेकर, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.