Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर – कोल्हापूरात छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शाहू KSA लीग स्पर्धेत शनिवारी झालेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब सामन्या मध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ४० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन आठवड्यांच्या ब्रेक नंतर सुरू झालेल्या फुटबॉल स्पर्धेत शनिवारी दुपारच्या सत्रात शिवाजी तरूण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब यांच्यात अतीशय चुरशीचा सामना सुरू होता.प्रॅक्टिस क्लब ने पूर्वधात गोल करून सामन्यावर पकड मजबूत केली होती. गोलची परफेड करण्यासाठी शिवाजी मंडळाचे जोरदार प्रयत्न सुरू होते. याच दरम्यान शिवाजी तरुण मंडळचा संकेत साळोखे आणि प्रॅक्टिस क्लबचा विदेशी खेळाडू यांच्यात वाद झाला. यावेळी राहुल आणि संकेत यांच्यात एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार घडला. इथूनच खेळाडूंच्यात वादाला सुरुवात झाली. या वादाची ठिणगी प्रेक्षक गॅलरीत सुद्धा पडली त्यामूळे दोन संघाच्या समर्थकांमध्ये जोरदार ईर्ष्या सुरू झाली. ईर्ष्या इतकी झाली की समर्थकांमध्ये एकमेकांस शिवीगाळ, अश्लील हावभाव, घोषणाबाजी, धक्काबुकीचा प्रकार देखिल घडला. या सर्व घटनमुळे स्टेडियम मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मॅच संपल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर देखील दोन्ही संघाचे समर्थक एकेमकांच्या अंगावर धाऊन गेले यावेळी पोलिसांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला गेला.
या सर्व घडलेल्या हाणामारी प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेले खेळाडू आहेत रोहन आडनाईक, योगेश कदम,संदेश कासार,ऋतुराज सूर्यवंशी,विक्रम शिंदे,संकेत साळोखे,मयुरेश चौगले,करण बंदरे,अर्जुन साळोखे,संकेत जाधव,राहुल पाटील,आदित्य पाटील,ओंकार जाधव,सचिन गायकवाड यांच्यासह अन्य २५ हून अधिक जणांचा समावेश आहे.
फुटबॉल स्पर्धा पुन्हा बंद पडणार???
फुटबॉल प्रेमी मध्ये जोरदार चर्चा…..!
कोल्हापूरचा फुटबॉल हांगामा सूरू झाल्यापासून हुल्लडबाजीने मैदानात आणि प्रेक्षक गॅलरीत पण सूरू झाली.पहिल्याच सामन्याची सुरूवातच वादाने झाली, त्यानंतर सामने पुढे ढकण्यावरून वाद झाले,आणि प्रॅक्टीस क्लब आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झालेला मोठा वादाचा प्रकार त्यामूळे फुटबॉल प्रेमी मधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.किती नियम केले, निर्बंध घातले, आचारसंहिता केली तरी देखिल इतक्या मोठ्या प्रमाणात वाद होणे, हाणामारी होणे याचे नक्की काय कारण असावे अशी चर्चा सुरू आहे. प्रेक्षक गॅलरीत वाद होणे अपेक्षित असते,पण मैदानात खेळाडूंमध्ये वाढत चाललेले वादाचे प्रकार यावर कुठेतरी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.
फुटबॉल प्रेमी मधून KSA च्या प्रशासनावर देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. जर एखादा संघ, एखादा खेळाडू नियमांचे, आचारसंहितेचे पालन करत नसेल तर त्यावर योग्य ती कारवाई केली जावी. हे सर्व वादाचे प्रकार वेळेत रोखले गेले नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असणारा कोल्हापूरचा फुटबॉल पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता आहे आशा प्रतिक्रिया फुटबॉल प्रेमी तसेच जेष्ठ नागरिकांमधून येत आहेत.
कोल्हापूरचा फुटबॉल सुरू रहावा यासाठी काय केले पाहिजे Comment द्वारे आपली प्रतिक्रिया नक्की द्या…👇👇