कोल्हापूर : श्रम फाउंडेशन वतीने कडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच कोल्हापुरातील व दुर्गम भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. श्रम फाउंडेशन गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्या माध्यमातून समाजातील अनेक गरजू लोकांना मदत मिळत असते.
श्रम फाउंडेशन ला मदतीचा हात म्हणून सुरश्री कला मंच संस्थेच्या वतीने ३० जानेवारी रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी श्रम फाउंडेशन ला देण्याचा मानस सुरश्री कलाकाराणी केला आहे. श्रम फाउंडेशनला मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तीनी याप्रसंगी देणगी, मदत देण्याच आवाहन फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.
कोल्हापुरातील मराठी पत्रकार संघाच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला श्रम फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कमलाकर सरांग संचालक दत्तात्रय सुतार, खजनिस पी एस कावणेक्रर, सचिव वैशाली सारंग यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते सुरज श्री मंचचे कलाकार उपस्थित होते.