शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्‍पर्धा : कोल्हापूर जिल्ह्याचे संघ विजयी…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 6 Second

सांगली: जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्‍हा क्रीडा परिषद सांगली आयोजित १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या शालेय राज्यस्तर कबड्डी क्रीडा नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतील मुलांच्या व मुलींच्या गटात कोल्हापूरजिल्ह्याचे संघ विजयी झाले असून या स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

            या स्‍पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्हातून २०० ते २५० खेळाडू मुले/ मुली व पंच, व्‍यवस्‍थापक सहभागी झालेले होते. या राज्यस्तरीय स्पर्धा कबड्डी मॅटवर विद्यूतझोतात सुसज्य अशा मैदानात दिवस व रात्रीच्यावेळी घेण्यात आल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रथमच शालेय राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा मॅटवर घेण्यात आल्या. या स्‍पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुले वयोगटात प्रथम क्रमांक कोल्हापूर, व्दितीय पुणे व तृतीय क्रमांक मुंबई विभागाने मिळविला. तर १९ वर्षाखालील मुली वयोगटामध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूर, व्दितीय औरंगाबाद व तृतीय क्रमांक मुंबई विभागाने मिळविला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *