रविवारी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार…..

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 52 Second

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर” ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.वी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा श्रृंखलेत आता ना नफा ना तोटा या तत्वावर अत्यंत कमी खर्चात पारदर्शक सेवा देणाऱ्या धर्मादाय श्रेणीतील पहिले “सिद्धगिरी जननी” या आय. व्ही. एफ. टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी १० वा सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रांगणात मा.ना. शशिकला जोल्ले (मंत्री धर्मादाय, हज्ज व वपफ बोर्ड, पालकमंत्री विजयनगर, (कर्नाटक), मा. खासदार आण्णासाहेब जोल्ले, लोकनियुक्त एसपी यशोदा वटगोडी, विविध मान्यवर व पाच हजार महिलांच्या उपस्थितीत होणार आहे, तरी नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धगिरी जननी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा विवेक पाटील त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी बोलताना पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात धर्मादाय श्रेणीत पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या चाचण्यांसह एकाच •छताखाली आय. व्ही. एफ. सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. आज वंध्यत्व निवारणासाठी उपचार घेणे हि सामन्यांच्या आवाक्यातील बाब राहिलेली नाही. अपत्य प्राप्तीसाठी आज अनेक दांपत्य वैद्यकीय उपचार घेत आहेत, बदलत्या जीवनशैलीमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात वंध्यत्व हि एक गंभीर समस्या होऊ शकते. यावर उपचार घेणे सामान्य लोकांना परवडणारे नाहीत, हि सेवा सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्वानुसार इतरत्र असणाऱ्या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात व पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विभागा करिता कर्नाटकच्या जोल्ले परिवाराने महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या हस्ते या विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. 

या वेळी अधिक माहिती देताना डॉ.वर्षा पाटील म्हणाल्या, “पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार व जोल्ले ग्रुपच्या योगदानाने हा विभाग कार्यान्वित होणार आहे. या विभागामुळे वंध्यत्व उपचार अत्यंत पारदर्शकपणे करण्यास अधिक हातभार लागणार आहे. सिद्धगिरी जननी विभागात उपचार प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर गुणवत्तेशी तडजोड न करता *इतर खाजगी केंद्रांच्या तुलनेत १/५ इतक्या कमी खर्चात हि सेवा दांपत्यासाठी* उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्यंत कमी शुक्राणूंच्या संख्येसाठी इंट्रा सायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहे. तसेच क्रॉनिक पीसीओडी किंवा खूप कमी AMH साठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने इथे उपचार करण्यात येतील. तसेच तरुण जोडप्यांसाठी बेसिक इंट्रा यूटेराइन इन्सेमिनेशन (IUI) हि उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक दांपत्याला सुरुवातीलाच उपचार प्रक्रियेची सर्व माहिती पारदर्शकपणे दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आयुर्वेदिक चिकित्सा यांचा मिलाफ करत येथे केलेल्या उपचारामुळे रुग्णांचे वंध्यत्व निवारण लवकर होण्यास मदत होईल. तसेच गरोदर मातांच्यासाठी महारष्ट्र व कर्नाटक येथे पहिल्यांदाच निवासी ‘गर्भसंस्कार’ विभाग हि कार्यान्वित आहे याचा लाभ हि सदृढ अपत्यासाठी होणार आहे.”

या पत्रकर परिषदेत मठाच्या कार्याची माहिती डॉ. संदीप पाटील यांनी दिली तर विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश भरमगौडर, धनंजय जाधव,राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, सागर गोसावी यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *