पत्रकार संघटनांची घेतली उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दखल…..!

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 35 Second

कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की खून राजापूर येथील घटनेची चौकशी करुन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तापास जलदगतीने व्हावा यासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे चार दिवसा पुर्वी कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन देऊन मागणी केली होती.

पत्रकार शशीकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांनी शशिकांत यांचा खूनच झाला आहे असा गंभीर आरोप केला आहे.आम्हाला मिळालेल्या माहिती प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदि, व  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनर वर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो” अशा आशयाची ती बातमी होती.. बातमीचे कात्रण ही वारीशे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनर संदर्भात हि बातमी दिलेली होती. यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीशे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते.  उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यानुसार पत्रकार संरक्षण कायदा प्रमाणे संबंधितांवर  गुन्हे दाखल व्हावेत, तात्काळ शासनाकडून पत्रकार वारीशे यांचे कुटुंबीयांना शासनाकडून २५ लाखाची मदत देऊन कुटुंबीयांना आधार द्यावा चौकशी अंती कुटुंबातील एका व्यक्तींला  शासन स्तरावर नोकरीवर घ्यावे अशी युवा पत्रकार संघाचे प्रमुख मागणी होती.या घटनेची युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे गंभीर दखल घेऊन निषेध नोंदवले होते. 

त्या अनुशंगाने रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विविध पत्रकार संघाचे मागणी आंदोलनचे गांभीर्य लक्षात घेऊन आज रत्नागिरी येथे मयत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली. तसेच मयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली,

  मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख व इतर माध्यमातून १५ लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत रोजगार महामेळाचे निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.

युवा पत्रकार संघाने अल्प समाधान व्यक्त केले असून वारीशे यांच्या कुटुंबाच्या खंबीरपणे यांच्या पाठीशी असून संबंधित गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होऊ पर्यंत आमच्या संघाकडून एकजुटीने सात असणार आहे तरी वारीशे यांच्या कुटुंबीयांनी काळजी न करता खंबीरपणे आपल्या विचारावर ठाम राहावे असे युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे व पदाधिकारी, सदस्य यांनी मत व्यक्त केले. संघाच्या कोल्हापुर येथील मुख्य कार्यालयात वारीचे यांच्या निधन झाल्याने शोकसभा घेण्यात आले

या वेळी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, सा, प्रगतधारा संपादक पंडितराज कर्णिक, निर्भिड पोलीस टाईमचे संपादक सुशांत पवार, राष्ट्रप्रथमचे संपादक बाबुराव वळवडे, न्युज आखाडाचे संपादक विनोद नाझरे, यांचे मनोगत झाले.राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शरद माळी, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, स्वरा फाउंडेशनचे डायरेक्टर प्रमोद माजगावकर व विठ्ठल इत्यादी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *