राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर…. राज्याला मिळाले नवे राज्यपाल…..!

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे.रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मोठी आंदोलने केली होती. त्यानंतर राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवण्यात आला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीला यश आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *