केआयटी कॉलेजमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची मुलाखत….

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 24 Second

कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या लीड इंडिया या व्यासपीठाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर माननीय श्री राहुल रेखावार यांच्याबरोबर विद्यार्थी संवादाचा कार्यक्रम आज ३ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात आयोजित केला गेला.

विद्यार्थ्यांनी जे आपण गोष्ट सहज करू शकतो त्यापेक्षा अशक्य त्या गोष्टी करण्याची धाडस या महाविद्यालयीन जीवनात करावे असे मत राहुल रेखावर सर यांनी व्यक्त केले अभियंत्यांमध्ये प्रश्न सोडवण्याचे जे कौशल्य असते ते प्रशासकीय सेवेमध्ये फार उपयोगी पडते असा स्व अनुभव त्यांनी सांगितला. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरताना विद्यार्थ्यांनी कौशल्य संपन्न होऊन देशाच्या व समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. शिक्षण व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला असलेल्या साधनातून स्वतःला समृद्ध करा कारण पूर्वी नव्हते एवढे साहित्य तुमच्या आजूबाजूला इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध आहे अशा भावना त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केल्या. विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या ओघांमध्ये कोल्हापूराच्या भविष्यातील प्रगती बद्दल विचारले असता त्यांनी हा जिल्हा खरोखरच संपन्न जिल्हा असून पर्यटन, ट्रान्सपोर्ट सेक्टर ,टेक्स्टाईल सेक्टर, लघुउद्योग या सर्व क्षेत्रावर लक्ष  केंद्रित करून विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची कास धरावी  असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.मुलाखत स्वरूपात  रंगलेल्या या चर्चासत्रात सरांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. राहुल रेखावार सर यांनी महावितरणच्या वतीने उज्वल भारत उज्वल मिशन अंतर्गत सहभागी झालेल्या केआयटीतील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे देऊन गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमिला राजपूत हिने केले.माननीय पाहुण्यांचा परिचय सुश्रुत शेळके यांनी केला.    रेखावार सर यांची मुलाखत विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश विधाते व ओंकार बिराजदार यांनी घेतली. साक्षी तळेकर या विद्यार्थिनीने या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत दळवी या विद्यार्थ्यांने केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी,कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिंन्नी, रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते, मुकुंद अंबी, प्रसाद दिवाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन लीड इंडिया व्यासपीठाचे समन्वयक प्रा.अमित वैद्य व प्रा.प्रियांका माने यांनी केले. विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सांगता सामुदायिक राष्ट्रगीताने झाली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *