Share Now
कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगच्या संयुक्त विद्यमाने उद्या, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता हॉलमार्क व इन्कम टॅक्स या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
चर्चासत्रामध्ये बीआयएसचे मुख्य अधिकारी आणि चार्टर्ड अकौंटंट दीपेश गुंदेशा मार्गदर्शन करणार आहेत. हॉलमार्कमधील बदल, ज्वेलरी सेक्टरमधील हॉलमार्क, हॉलमार्क लायसन्स, हॉलमार्क भविष्यातील गरज, एचयूआयडी तसेच इन्कम टॅक्समधील बदल, लेट इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स आणि जीएसटी आदी गोष्टींवर माहिती देऊन, चर्चा होणार आहे.
दरम्यान, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, मंगळवार पेठ येथे होणाऱ्या चर्चासत्राचा लाभ सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश तेजपाल राठोड व दैवज्ञ बोर्डिंगचे अध्यक्ष विजय घारे यांनी केले आहे.
Share Now