Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:56 Second
गगनबावडा प्रतिनिधी अक्षय पोतदार
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्री राम मंदिर चौकात शिव जयंती उत्सव समिती, गगनबावडा यांचे मार्फत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माझी उप सरपंच व विद्यमान सदस्य अरुण भाऊ चव्हाण व ग्रामपंचायत सदस्या वृंदा पाध्ये यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुजित माईनकर,राजू गवळी,गणपती जाधव,चंद्रकांत पोतदार,मोहन जाधव,विवेक पोतदार,प्रकाश वरेकर,सखाराम जाधव व मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share Now